सरकारी नोकरी पगार 92 हजार; ITBP मध्ये काम करण्याची सुवर्णसंधी

इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस फोर्स (ITBP) मध्ये नोकरी(job) करण्याची सुवर्णसंधी. ITBP कडून सहाय्यक उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल या गट ‘क’ (अराजपत्रित आणि अ-मंत्रालयीन) श्रेणीतील पदांसाठी रिक्त जागासंबंधी भरतीप्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यासंबंधीची अर्ज प्रक्रिया सुरु झाले आहेत.

या भरतीप्रक्रियेमध्ये(job) सहभागी होऊ इच्छिणारे उमेदवार ITBP itbpolice.nic.in च्या अधिकृत वेबसाइटद्वारे तात्काळ अर्ज करू शकतात. उमेदवारांना 26 नोव्हेंबरपर्यंत या अर्जप्रक्रियेकरिता अर्ज करता येईल. एकूण 9 पदांच्या 20 जागांसाठी ही भरतीप्रक्रिया सुरु आहे. या भरतीप्रक्रियेबद्दल अधिक जाणून घेऊया

ITBP मधील पदे  आणि जागा

  • सहाय्यक उपनिरीक्षक (प्रयोगशाळा तंत्रज्ञ) – 7 जागा
  • सहाय्यक उपनिरीक्षक (रेडिओग्राफर) – 3 जागा
  • सहाय्यक उपनिरीक्षक (OT तंत्रज्ञ) – 1 जागा
  • सहाय्यक उपनिरीक्षक (फिजिओथेरपिस्ट) – 1 जागा
  • हेड कॉन्स्टेबल (CSR असिस्टंट) – 1 जागा
  • कॉन्स्टेबल (टेलिफोन ऑपरेटर कम रिसेप्शनिस्ट) – 2 जागा
  • कॉन्स्टेबल (ड्रेसर) – 3 जागा
  • कॉन्स्टेबल (शिपाई) – 1 जागा
  • कॉन्स्टेबल (लिनेन कीपर) – 1 जागा
  • एकूण जागांची संख्या – 20

ITBP भरती वयोमर्यादा

या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय किमान  18 ते 28  वर्षा दरम्यान असणे आवश्यक आहे. जाणून घेऊया विविध पदांकरिता असलेली वयोमर्यादा

  • सहाय्यक उपनिरीक्षक (प्रयोगशाळा तंत्रज्ञ) – 20 वर्षे ते 28 वर्षे
  • सहाय्यक उपनिरीक्षक (रेडिओग्राफर) – 20 वर्षे ते 28 वर्षे
  • सहाय्यक उपनिरीक्षक (OT तंत्रज्ञ) 18 वर्षे ते 25 वर्षे
  • सहाय्यक उपनिरीक्षक (फिजिओथेरपिस्ट) 18 वर्षे ते 25 वर्षे
  • हेड कॉन्स्टेबल (CSR सहाय्यक) 18 वर्षे ते 25 वर्षे
  • कॉन्स्टेबल (टेलिफोन ऑपरेटर कम रिसेप्शनिस्ट) 18 वर्षे ते 25 वर्षे
  • कॉन्स्टेबल (ड्रेसर) 18 वर्षे ते 25 वर्षे
  • कॉन्स्टेबल (शिपाई) 18 वर्षे ते 25 वर्षे
  • कॉन्स्टेबल (लिनेन कीपर) 18 वर्षे ते 25 वर्षे

ITBP अर्ज शुल्क 

सामान्य, OBC आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभागातील (EWS) उमेदवारांसाठी अर्ज शुल्काची रक्कम ही  100 रुपये आहे. तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला आणि माजी सैनिकांना या अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे.

ITBP भरती  वेतन 

या भरतीप्रक्रियेतून जे उमेदवार निवडण्यात येतील त्यांना शासनाच्या  7 व्या वेतन आयोगानुसार पे मॅट्रिक्स स्तर 3, 4 आणि 5 वर नियुक्त केले जाईल. या अंतर्गत वेतनश्रेणी खालीलप्रमाणे आहे.

  • वेतन स्तर 5: रु 29,200 ते रु. 92,300
  • वेतन स्तर 4: रु 25,500 ते रु 81,100
  • वेतन स्तर 3: रु 21,700 ते रु. 69,100

सूचना आणि अर्ज लिंक पहा

ITBP भर्ती 2024 अधिसूचना- https://recruitment.itbpolice.nic.in/rect/index.php या लिंकवर जाऊन होम पेजमध्येच न्यूज या कॉलममध्ये तुम्हाला या भरतीप्रक्रियेची पीडीएफ डाऊनलोड करता येऊ शकते.
ITBP भर्ती 2024 साठी अर्ज करण्यासाठी लिंक- https://www.itbpolice.nic.in/

ITBP निवड निकष 

  • शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)
  • शारीरिक मानक चाचणी (PST)
  • लेखी परीक्षा
  • मूळ कागदपत्रांची पडताळणी
  • तपशीलवार वैद्यकीय चाचणी (DME)/पुनरावलोकन वैद्यकीय चाचणी (RME)

त्यामुळे या भरतीसाठी उमेदवारांनी  तात्काळ अर्ज करणे अपेक्षित आहे.

हेही वाचा :

अजित पवारांना निवडणुकीच्या तोंडावर सुप्रीम कोर्टाचा दणका

उद्धव ठाकरेंकडे असं दडलंय तरी काय? पुन्हा गोवा महाराष्ट्र सीमेवर गाडी अडवली

‘एक नाही तर तब्बल 8 वेळा सलमानसोबत रात्र…’; ‘या’ अभिनेत्रीच्या वक्तव्याने खळबळ