आज अनेक शुभ योग; 4 राशींना होणार डबल लाभ, पाण्यासारखा पैसा कमवणार
आज गुरुवार, 14 नोव्हेंबर रोजी चंद्र मेष राशीत(heroscope) भ्रमण करणार आहे. तसेच आज कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी असल्याने ही तिथी वैकुंठ चतुर्दशी म्हणून ओळखली जाते.
वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी सिद्धी योग, रवि योग आणि अश्विनी नक्षत्र यांचा शुभ संयोग(heroscope) होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना या शुभ योगांचा फायदा होणार आहे, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
वृषभ रास
आजचा दिवस वृषभ राशीच्या लोकांसाठी आशेचा नवीन किरण घेऊन आला आहे. वृषभ राशीचे लोक आज चांगले पैसे वाचवू शकतील. प्रत्येक पावलावर नशीब त्यांना साथ देईल. आज मालमत्तेशी संबंधित एखादी चांगली डील होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा होईल.
आज नवीन व्यवसायाच्या आणि नवीन डील करण्याच्या संधी मिळाल्याने व्यावसायिक प्रचंड खुश दिसतील, तुमच्या व्यवसायात चांगली वाढ होईल. आज नोकरी करणारे लोक आनंदी दिसतील आणि त्यांना इतर कंपनीकडून चांगल्या नोकरीची ऑफर देखील मिळेल.
सिंह रास
आज सिंह राशीच्या लोकांसाठी दिवस अतिशय शुभ असणार आहे. सिंह राशीच्या लोकांना प्रत्येक पावलावर नशिबाची साथ मिळेल. विरोधकांवर तुमचा वरचष्मा राहील आणि आजचा दिवस गुंतवणूक आणि पैशाच्या बाबतीत चांगला असेल. समाजातील अनेक प्रतिष्ठित लोकांशी तुमचे चांगले संबंध निर्माण होतील.
तुम्ही तुमची अनेक कामं सहजपणे पूर्ण करू शकाल. तुमचे कोणतेही सरकारी काम खूप दिवसांपासून प्रलंबित असेल तर ते सरकारी अधिकाऱ्याच्या मदतीने आज पूर्ण होऊ शकते आणि तुम्हाला काही सरकारी योजनेचा लाभही मिळेल. आज दुकान आणि व्यवसाय असलेल्यांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदारासोबत तुमचे संबंध चांगले राहतील.
कन्या रास
आजचा दिवस कन्या राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. कन्या राशीच्या लोकांच्या अनेक इच्छा आज पूर्ण होतील आणि नारायणाच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व शंका देखील दूर होतील, ज्यामुळे तुम्ही सर्व गोष्टींवर चांगलं लक्ष केंद्रित कराल.
या राशीच्या काही लोकांच्या कुटुंबात आज काही शुभ कार्यक्रम होऊ शकतो, ज्यात ते दिवसभर व्यस्त राहतील. गुंतवणुकीसाठी आजचा दिवस अतिशय शुभ असेल आणि आज एखाद्याकडून अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना आज दुसऱ्या एखाद्या कंपनीकडून चांगली ऑफर मिळू शकते, ज्याची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होता.
मकर रास
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साहाचा असणार आहे. मकर राशीच्या लोकांना आज मौजमजेच्या अनेक संधी मिळतील आणि कुटुंबातील सदस्याकडून चांगली बातमी देखील मिळेल, ज्यामुळे तुम्ही दिवसभर आनंदी दिसाल. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना आज एखाद्या मित्राकडून चांगली बातमी मिळू शकते.
आज तुम्ही खर्च कमी करण्याच्या दिशेने वाटचाल कराल, ज्यामुळे तुमची संचित संपत्ती वाढेल. भागीदारीत व्यवसाय करणारे आज नवीन योजनांवर काम करतील, ज्यातून चांगला नफा मिळेल. तसेच आज तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी कामातून थोडा वेळ काढाल. मित्रांच्या सहकार्याने तुम्ही अनेक कामं पूर्ण करू शकाल.
(टीप : वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
सरकारी नोकरी पगार 92 हजार; ITBP मध्ये काम करण्याची सुवर्णसंधी
‘एक नाही तर तब्बल 8 वेळा सलमानसोबत रात्र…’; ‘या’ अभिनेत्रीच्या वक्तव्याने खळबळ
उद्धव ठाकरेंकडे असं दडलंय तरी काय? पुन्हा गोवा महाराष्ट्र सीमेवर गाडी अडवली