“स्वतःला मर्द समजणाऱ्या ठाकरेंच्या बॅगमध्ये लिपस्टिक-लाली..”; नितेश राणेंची खोचक टीका
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय(political) वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच राज्यात सध्या बॅग तपासणीवरून राजकारण पेटलं आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची नाशिक येथे सभा होती.
याच सभेसाठी ते हेलिकॉप्टरने वणी येथे पोहोचले होते. मात्र, वणीमधील हेलिपॅडवर उतरताच उद्धव ठाकरे(political) यांच्या ताफ्यातील बॅग तपासण्यात आल्या. यावरून ठाकरे गटासह महाविकास आघाडीतील नेत्यांकडून संताप व्यक्त केला जातोय.
याच प्रकरणावरून भाजप नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. बॅग तपासली गेली त्यात एवढं थयथयाट करण्याचं कारण काय? यांच्या पर्समध्ये (बॅगमध्ये )लिपस्टिक लाली भेटते काय हे निवडणूक आयोग तपासत असेल. स्वतःला मर्द समजणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या बॅगेत पुरुषाचे सामान आहे का, ते बघण्यासाठी ते चेक करत असतील, असा खोचक टोला नितेश राणे यांनी लगावला.
उद्धव ठाकरेंचा एवढा तमाशा का? ते कोण मोठे लागून गेले आहेत का?, अशी टीका देखील नितेश राणे यांनी केली. आमच्या देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा बॅग तपासली गेली. ते यांच्यासारखे चॉकलेट चोरल्यासारखं रडले नाहीत. अधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे धमक्या देत होते, उद्धव ठाकरेंच्या फिरण्यावर बंदी टाकां, अशी मागणी मी निवडणूक आयोगाला करणार असल्याचंही नितेश राणे म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, “निवडणूक आयोगाचा नियम आहे. पण, त्यांनी उद्धव ठाकरेंची बॅग तपासायला नको होती. त्यात लिपस्टिक लाली मिळाली असती तर…आमचा नेत्यांचा काही आक्षेप नाही. ज्याला लपवायचं आहे तो थयथयाट करतो”, असा टोलाही नितेश राणे यांनी लगावला आहे.
दरम्यान, नाशिकनंतर लातूरमध्ये देखील उद्धव ठाकरेंच्या पुन्हा बॅगा तपासण्यात आल्या. यानंतर मविआतील बऱ्याच नेत्यांनी महायुती सरकारवर टीका केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्याही बॅगा तपासल्याचे व्हिडिओ समोर आले. या बॅग तपासणीवरून आता महायुती आणि महाविकास आघाडीमधील नेते एकमेकांना भिडले आहेत.
हेही वाचा :
‘एक नाही तर तब्बल 8 वेळा सलमानसोबत रात्र…’; ‘या’ अभिनेत्रीच्या वक्तव्याने खळबळ
सरकारी नोकरी पगार 92 हजार; ITBP मध्ये काम करण्याची सुवर्णसंधी
आजअनेक शुभ योग; 4 राशींना होणार डबल लाभ, पाण्यासारखा पैसा कमवणार