‘दर ठरलाय त्यांना पुन्हा पदरात घेणार नाही’, उद्धव ठाकरेंच गद्दारांबाबत मोठं वक्तव्य

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी (Political news)अवघे काही दिवस उरले आहेत. अशातच राज्यातील राजकीय वर्तुळात देखील मोठ्या घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधाकांनी जाहीर सभांचा धडाका लावला आहे. अशातच उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत अनेक खुलासे केले आहेत. गद्दारांबद्दल काय म्हणाले उद्धव ठाकरे?

राज्यात विधानसभा(Political news) निवडणूक जाहीर झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी झी 24 तासच्या जाहीर सभेमध्ये आठ आमदार आणि दोन मंत्री जे काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्ष सोडून गेले होते ते संपर्कात असल्याचं म्हटलं होतं. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्याचा दर ठरलाय त्यांना मला पुन्हा पदरात घेयचं नाहीये. मला माझ्या पक्षामध्ये अशी लोकं नको आहेत.

विकली जाणारी आणि विकली गेलेली लोकं मला परत घेयची नाहीत.आता माझ्या शिवसेनेला नवीन उभारी आलेली आहे. पक्षात अनेक तरुण उभे राहिले आहेत. अनेक ठिकाणी बाळासाहेबांच्या वेळीची लोकं यांच्यामुळे कंटाळून गेलेली ती आता परत आली आहेत. त्यामुळे माझी शिवसेना आता जोमात आहे आणि ती लोकं कोमात आहेत. असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मशाल हे चिन्ह आम्ही पूर्वीदेखील घेतलं होतं. ज्यावेळी छगन भुजबळ आमच्यासोबत होते त्यावेळी देखील आम्ही मशाल चिन्ह घेतलं होतं. त्यामुळे मशाल हे चिन्ह आमच्यासाठी चांगलं आहे. आताच्या काळामध्ये ते चिन्ह अत्यंत योग्य आहे. हे भ्रष्ट आणि गद्दार लोकांना जाळून टाकण्यासाठी मशाल चिन्ह पाहिजे आणि आता ते आमच्याकडे आहे.

हेही वाचा :

टीम इंडियाला T20 संघात मिळाला विराट कोहलीचा रिप्लेसमेंट! 

एका झटक्यात गाडीतून किलोभर लोक रस्त्यावर फेकले, Viral Video

अभिषेक-ऐश्वर्या खरंच विभक्त झाले?, अमिताभ बच्चन यांच्या पोस्टने चर्चेला पुन्हा उधाण