“मी आता थोड्याच दिवसांचा पाहुणा…” मनोज जरांगे यांची भावनिक साद
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील(political news todays) हे नाव चांगलंच चर्चेत आहेत. जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी केलेली आंदोलने, उपोषण, सरकारसोबत चर्चा त्यानंतर विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा या सगळ्यांमुळे ते घरांघरांत पोहोचले आहेत. दरम्यान आता मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीविषयी मोठं अपडेट समोर आलंय. एका वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त दिलंय.
मनोज जरांगे पाटील यांनी ऐनवेळेस विधानसभा(political news todays) निवडणुकीतून माघार घेतली. त्यांनंतर राजकीय वर्तुळातून अनेक तर्क-वितर्क लावण्यात आले. परंतु जरांगे पाटील मात्र याकडे लक्ष न देता गावोगावी जावून मराठा कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत चर्चा करत आहेत. दरम्यान लासलगावमध्ये जरांगे पाटलांनी केलेलं एक विधान चांगलंच चर्चेत आलंय. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी स्वत:च्या प्रकृतीविषयी कार्यकर्त्यांना माहिती दिलीय.
लासलगावमध्ये मराठा समाजाच्या लोकांसोबत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मी तुमचा थोड्याच दिवसांचा पाहुणा आहे. माझं शरीर मला साथ देत नाही. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. माझ्या समाजाचा लढा अर्धवट राहू नये, माझा समाज आरक्षणापासून लांब राहू नये, अशी इच्छा जरांगे पाटलांनी व्यक्त केलीय. यावेळी ते म्हणाले की, मला दर आठ ते पंधरा दिवसांनी सलाईन घ्यावं लागतंय. हे शरीर आहे, कधी जाईल माहिती नाही. मी तुमच्यात किती दिवस राहील, हे मला माहित नाही, असं देखील मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
जरांगे पाटील म्हणाले की, मी उपोषणं केलेली आहेत. त्यामुळे मला चालताना, चढताना-उतरताना देखील खूप त्रास होतोय. शरीर कधी धोका देईल, हे सांगता येत नाही. विधानसभा निवडणुकीतील मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानंतर राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी मराठा उमेदवारांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले होते.
परंतु, उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या रात्री माघार घेण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. त्यानंतर मनोज जरांगे यांनी ‘कुणाला पाडायचं, कुणाला जिंकवायचं’ यासंदर्भात विधान केलं होतं. त्यानंतर आता “मी आता थोड्याच दिवसांचा पाहुणा” असं मनोज जरांगे यांनी केलेलं विधान चिंतेचा विषय ठरत आहे.
हेही वाचा :
भाजपला मोठा धक्का ! ‘या’ नेत्याचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
‘केंद्रातील मोदी सरकारने देशातील जनतेला लुटले’; खुद्द मुख्यमत्र्यांनीच केली टीका
सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय; यापुढे…