मोठी बातमी! नवनीत राणांच्या प्रचारसभेत राडा; अंगावार खुर्च्या फेकल्या
अमरावतीच्या खल्लार गावात घडलेल्या घटनेने राजकीय(Politics) वातावरण चांगलंच तापलं आहे. सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. अमरावतीच्या दर्यापूर विधानसभा मतदारसंघातील खल्लार येथे खासदार नवनीत राणा यांच्या प्रचारसभेत हल्ला झाला. यावेळी काही उपस्थितांनी राणा यांच्या दिशेने खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न केला. अंगरक्षकांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने गंभीर काही घडलं नाही.
ही घटना दर्यापूर मतदारसंघातील खल्लार गावात युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार(Politics) रमेश बुंदीले यांच्या प्रचारसभेदरम्यान घडली. सभेत जमलेल्या काही विरोधकांनी अचानक गोंधळ घालायला सुरुवात केली आणि राणा यांच्या दिशेने खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न केला. यामुळे सभेत एकच खळबळ उडाली. यावेळी अंगरक्षकांच्या मदतीने नवनीत राणा थोडक्यात बचावल्या.
या घटनेनंतर नवनीत राणा यांनी खल्लार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत हल्ल्याच्या कारणांबाबत तपासाची मागणी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून काही लोकांची ओळख पटल्याचे समजते. दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण अमरावती जिल्ह्यात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नवनीत राणा यांच्यावर हल्ला हा पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप त्यांचे समर्थक करत आहेत.
दर्यापूर विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची हवा आधीच तापलेली असताना ही घटना अधिक चर्चेत आली आहे. या हल्ल्यामुळे मतदारांवर काय परिणाम होईल, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. विरोधी पक्षांनी या घटनेचा फायदा घेत राणा यांच्या प्रतिमेला धक्का देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या घटनेमुळे निवडणूक प्रचारात नेत्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पोलीस प्रशासनाने नेत्यांच्या सुरक्षेबाबत अधिक सावधानता बाळगण्याचे निर्देश दिले आहेत. या घटनेनंतर खल्लार गाव आणि दर्यापूर मतदारसंघात मोठा गोंधळ उडाला आहे. मतदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी प्रचारसभांमध्ये अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडणार नाहीत याची दक्षता घेण्याची मागणी होत आहे.
हेही वाचा :
“मी आता थोड्याच दिवसांचा पाहुणा…” मनोज जरांगे यांची भावनिक साद
‘केंद्रातील मोदी सरकारने देशातील जनतेला लुटले’; खुद्द मुख्यमत्र्यांनीच केली टीका
प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी दिसताच विमाननतळावर ताफा अचानक जागेवर थांबला!