नयनताराला धनुषच्या टीमनं दिला 24 तासांचा अल्टीमेटम; तर नेटफ्लिक्सला धमकी

दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा सध्या तिच्या ‘नयनतारा: बियॉन्ड द फेरीटेल’ या डॉक्युमेंट्रीमुळे चर्चेत आहे. या डॉक्युमेंट्रीमुळे (documentary) होणाऱ्या वादाची सगळीकडे चर्चा सुरु आहे. खरंतर, नयनताराच्या या सीरिजच्या विरोधात अभिनेता धनुषनं 10 कोटींची नोटीस बजावली आहे. त्यावर नयनतारानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिचा संताप व्यक्त केला आहे. आता धनुषच्या टीमनं नयनताराच्या या पोस्टवर उत्तर दिलं आहे.

नयनतारानं नुकतीच सोशल मीडियावर एक भलीमोठी पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट शेअर करत नयनतारानं तिच्या मनातली गोष्ट सांगितली आहे. नयनतारानं तिच्या या डॉक्युमेंट्रीमध्ये(documentary) धनुषनं निर्मिती केलेल्या चित्रपटातील काही सेकंद दाखवले आहे. या 3 सेकंदाच्या क्लिपवर धनुषनं 10 कोटींची नोटीस बजावल्यानं सगळ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

आता त्यात त्यांनी काय वापरलं आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ‘नानुम राउडी धान’ या चित्रपटातील गाण्यातील एक छोटासा भाग त्यांनी त्या डॉक्युमेंट्रीमध्ये वापरला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन हे तिचा नवरा विघ्नेश शिवननं केलं आहे. तर नयनतारा या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसली. आता नयनताराला धनुषच्या टीमनं एक लीगल भाषेत धमकी दिली आहे.

नयनतारावर असलेली ही डॉक्युमेंट्री पाहिल्यानंतर धनुषमध्ये वाद झाला आहे. आता धनुषच्या टीमनं नयनतारा आणि नेटफ्लिक्सला 24 तासांचं अल्टीमेटम दिलं आहे. धनुषच्या वकीलांनी एक स्टेटमेंट शेअर केलं आहे. त्यासोबत त्यांनी सांगितलं की माझ्या क्लाएंटनं या चित्रपटाची निर्मिती केली आहे आणि त्यांनी या प्रोडक्शनसाठी एक-एक पैसे खर्च केला आहे. तुमच्या क्लाएंटनं सांगितलं की माझ्या क्लायएंटनं कोणत्याही व्यक्तीला BTS शूट करण्यासाठी कोणाला ठेवलं नव्हतं आणि हे स्टेटमेंट बेसलेस आहे. तुमच्या क्लाइंटला याचा पुरावा द्यावा लागेल.

पुढ नयनतारावर निशाना साधत ते म्हणाले, ‘नानुम राउडी धान’ वर त्यांच्या क्लाएंटच्या असलेल्या कॉपीराइटचं क्लेम पाहता ते कॉन्टेन्ट हे पुढच्या 24 तासांच्या आत ओटीटी प्लॅटफॉर्मवरून काढावं लागेल. असं केलं नाही तर माझ्या क्लाएंटला तुमच्या क्लाएंटला आणि नेटफ्लिक्स इंडियाविरोधात कायदेशीर कारवाई करावी लागेल आणि त्यांना भरपाई म्हणून 10 कोटी द्यावे लागतील.

हेही वाचा :

इलॉन मस्कला ट्रम्पचा पाठिंबा महागात पडतोय! 

प्रचारसभा थंड होताच ‘खिशे’ झाले गरम, मध्यरात्री पडला पैशांचा पाऊस?

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना यश मिळणार? ज्योतिषाचार्यांचं भाकित