भाजप अन् काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा
आज राज्यभर विधानसभा निवडणूक(current political news) पार पडत आहे. अशातच काही ठिकाणी शांततेत मतदान होत आहे. तर काही ठिकाणी पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा होत असल्याचं चित्र समोर येत आहे. असाच एक धक्कादायक प्रकार चंद्रपूर जिल्ह्यात घडला आहे. कारण चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर शहरात आज भाजप व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला आहे. यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास आमदार(current political news) बंटी भांगडिया, माजी आमदार मितेश भांगडिया हे जिल्हा परिषद कन्याशाळा येथे आझाद वार्ड, नेहरू वार्डचे बुथ याठिकाणी कार्यकर्त्यांसह आले. तर त्यावेळी जिल्हा परिषदचे माजी सदस्य गजानन बुटके हे देखील आपल्या काँग्रेस बुथजवळ पोहोचले. मात्र त्यावेळी त्यांच्यासोबत बाऊन्सर होते.
यानंतर आमदार भांगडिया यांनी आक्षेप घेत बॉऊन्सरना त्या ठिकाणावरून जाण्यास सांगितलं. यामुळे केंद्राबाहेर चांगलीच बाचाबाची सुरू झाली. मात्र यानंतर घटनास्थळी घोषणा सुद्धा देण्यात आल्या. यामुळे परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून हा तणाव शांत केला.
हेही वाचा :
ऐन निवडणुकीत भाजपचा सुप्रिया सुळेंवर अत्यंत गंभीर आरोप, राजकारणात खळबळ
शिंदे गटाच्या नेत्याच्या संबंधित गाडीत सापडले कोट्यवधी रुपये!
राज्यात मतदान सुरूच होताच अनेक ठीकाणी EVM पडले बंद