धनंजय मुंडेच्या परळीत जोरदार राडा, EVM मशीन फोडल्या, 40 जणांवर गु्न्हे दाखल

विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या(political news) दिवशी परळी मतदार संघातील घाटनांदूर येथे मतदान केंद्रावर तोडफोडीची घटना घडली होती. यावेळी मतदान केंद्रावर असलेल्या ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट मशीनची तोडफोड केल्याचं देखील समोर आलं होत. आता याप्रकरणी जवळपास 40 जणांवर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात अतिशय गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले.

महाविकास आघाडीचे नेते ऍड. माधव जाधव यांना कन्हेरवाडी येथे मारहाण करण्यात आली. व्हिडीओ व्हायरल(political news) होताच या मारहाणीचे पडसाद संपूर्ण मतदार संघात उमटले. यावेळी मतदान केंद्राची तोडफोड आणि कर्मचाऱ्याला सुद्धा मारहाण झाल्याची तक्रार देण्यात आली आहे आणि यानूसार चाळीस जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केलेत यापैकी सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माधव जाधव यांना मारहाण झाल्यानंतर त्याचे पडसाद घाटनांदुर या ठिकाणी म्हटले आणि घटना येथील मतदान केंद्र मध्ये तोडफोड होऊन झाली या प्रकरणी 40 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि याच घटनेच्या निषेधार्थ आज घाटनांदुर बंद ठेवण्यात आलेले आहे सकाळपासून मधील दुकाने उघडलेली नाहीत. कालच्या घटनेनंतर पोलिसांनी दाखल केलेल्या तरुणावरील गुन्ह्याच्या निषेधार्थ आज घटनादुरु बंद आहे.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आणि मुलाने मतदारसंघात दहशत निर्माण केल्याचा आरोप अजित पवार गटाचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी केला आहे. परळी विधानसभा मतदारसंघांमध्ये कधी नव्हे ते गालबोट या निवडणुकीला लागले असून या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे राजेसाहेब देशमुख यांच्याकडून दहशत पसरवण्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे.

घाटनांदुर मुरंबी तसेच चोथेवाडी या ठिकाणी मतदान यंत्राची तोडफोड करण्यात आली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बन्सी शिरसाट यांनाही मारहाण केली असल्यास आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. ज्यांनी तोडफोड केली त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सुद्धा धनंजय मुंडे यांनी केली आहे.

परळी विधानसभा मतदारसंघांमध्ये बोगस मतदान होत असल्याची तक्रार शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख हे करत आहेत. याचदरम्यान परळी शहरातील बँक कॉलनी परिसरामध्ये असलेल्या मतदान केंद्रावर उमेदवार मतदान केंद्रातील माहिती घेत असताना बाहेर उभे असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते ऍडव्होकेट माधव जाधव यांना तीन ते चार जणांनी मारहाण केल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

बीड जिल्ह्यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडत आहे परळी विधानसभा मतदारसंघ वगळता पाचही मतदार संघामध्ये सुरळीतपणे मतदान प्रक्रिया दुपारपर्यंत पार पडली मात्र याला अपवाद ठरले. आष्टी विधानसभा मतदारसंघातील पाटोदा तालुक्यातील बेदरवाडी गाव भाजपाचे उमेदवार सुरेश धस यांचे समर्थक आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार महबूब शेख यांच्या समर्थकांमध्ये काही कारणावरून बाचाबाची झाली मात्रे संपूर्ण प्रकरण हाणामारीमध्ये गेले. सुरेश धस समर्थकांना महबूब शेख यांच्या समर्थकांकडून मारहाण करण्यात आल्याचा दावा केला जात आहे.

हेही वाचा :

भाजपला बसणार धक्का, ‘इतक्या’ जागा मिळणंही कठीण?

राज्यात पुन्हा खळबळ! निवडणुकीच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप

“ही लढाई हिंदुत्वाची, आपला धर्म वाचवायचा..”; केतकी चितळेचा नवा व्हिडिओ समोर