राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार का? राजकीय घडामोडींवर मोठी अपडेट!

राज्यात 26 नोव्हेंबर पूर्वी नवीन सरकार स्थापन होणं आवश्यक आहे.(developments) मात्र कोणालाही स्पष्ट बहुमत मिळालं नाही, तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ येणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.येत्या 26 नोव्हेंबरला विधानसभेचा कालावधी संपत आहे. त्यानंतर पुढच्या दोनच दिवसात नवीन सरकार स्थापन करण्याची तयारी राजभवनाला करावी लागणार आहे.

मात्र या काळात महायुती किंवा महाविकास आघाडीने सरकार स्थापन न केल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी लागणार आहे. 2019 मध्ये ज्या प्रकारचं राजकीय नाट्य बघायला मिळालं होतं. त्याचीच पुनरावृत्ती या निवडणुकीत देखील बघायला मिळते का, ते पाहाणं महत्वाचं ठरणार(developments) आहे. त्या दृष्टीने आता राज्यात हालचाली सुरू झाल्या असून महायुती आणि मविआकडून तयारी देखील सुरू करण्यात आली आहे.

विमान, हेलिकॉप्टर, हॉटेल देखील राजकीय पक्षांकडून बुक करण्यात आलेले आहेत. आमदारांना कुठे ठेवायचं, बंडखोर, अपक्ष आमदारांना कशाप्रकारे आपल्या बाजूने करून (developments)घ्यायचं यासाठी आता रणनिती आखली जात आहे. त्यामुळे आता 26 नोव्हेंबर ही तारीख राज्याच्या राजकारणासाठी महत्वाची असणार आहे. या कालावधीत सरकार स्थापन करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीचा कस लागणार आहे.

हेही वाचा :

मोठी बातमी! शाळेतील वादातून वर्गात विद्यार्थ्याचा गळा चिरला

दहावी आणि बारावीच्या परिक्षांचे वेळापत्रक जाहीर, कधी होणार परिक्षा!

कोल्हापुरात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यास धक्काबुक्की; हजारो कार्यकर्ते आमने-सामने

मोठी बातमी! शाळेतील वादातून वर्गात विद्यार्थ्याचा गळा चिरला

विश्वचषक गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूवर जर्मनीत सर्जरी