आज मासिक शिवरात्री, भोलेनाथ ‘या’ राशींवर ठेवणार कृपादृष्टी!
दैनिक राशिफळ(zodiac signs) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी असते. यामध्ये मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या 12 राशींचे तपशीलवार वर्णन केले जाते.
ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
त्यानुसार आज 29 नोव्हेंबरचा दिवस कोणत्या राशीसाठी(zodiac signs) कसा असेल ते पाहुयात. आज शुक्रवारी, कार्तिक मासातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. त्रयोदशी तिथी सकाळी 8 वाजून 41 मिनिटांपर्यंत राहील, त्यानंतर चतुर्दशी तिथी सुरू होईल.
तसेच आज राहू काळ सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल ते 12 वाजेपर्यंत असेल. त्याशिवाय आज मासिक शिवरात्री आहे.शिवभक्तांसाठी हा महत्त्वाचा दिवस असतो. तर, आज भगवान शिव कोणत्या राशीवर कृपादृष्टी ठेवणार, ते पाहुयात.
मिथुन : आज तुम्हाला नवीन संधी चालून येईल. नोकरीचा शोध पूर्ण होईल. शेअर बाजारातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आज तुम्हाला अचानक धनलाभ देखील होण्याची संभावना आहे. आज तुमचे जवळच्या व्यक्तीसोबत असलेले वाद संपुष्टात येतील.
कर्क: कामाच्या ठिकाणी आज तुमचे कौतुक होईल. तुम्हाला प्रमोशन मिळेल. पगारात भरभक्कम वाढ होईल. अधिकाराचा अति वापर टाळावा. दिवसभर कामात गर्क राहाल. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल. वैचारिक दिशा बदलून पहावी. आज तुमच्यावर भोलेनाथ यांची कृपा राहील.
सिंह : कौटुंबिक सौख्याचा लाभ घ्याल. कलाक्षेत्राबाबत अपेक्षित वार्ता मिळतील. हित शत्रू त्रास देण्याचा प्रयत्न करतील. मनातील अनामिक भीती काढून टाकावी. कलेशी संबंधित व्यक्तींना योग्य व्यासपीठ मिळेल. विवाहाचा शोध पूर्ण होईल. मनासारखे स्थळ चालून येईल.
कन्या : कोणतीही गुंतवणूक सावधगिरीनेच करावी. वाहन चालवताना काळजी घ्यावी. आज लांबचा प्रवास योग आहे. रागावर नियंत्रण ठेवा. समोरील गोष्टीत आनंद शोधावा.कामाची दिवसभर धांदल राहील. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक केले जाईल.
हेही वाचा :
‘या’ देशात 50 टक्के पेक्षा जास्त घेतला जातो Income Tax
हिवाळ्यात आरोग्यदायी कारल्याचा रस बनवा घरच्या घरी झटपट रेसिपी
इचलकरंजीतील कारखानदाराला सव्वा कोटींचा फसवणूक प्रकरण नाशिकच्या उद्योजकाचे नाव चर्चेत