विदर्भाला सर्वाधिक मंत्रिपदांची आशा; तीन नव्या चेहऱ्यांना मिळणार स्थान?”
विधानसभा निवडणुकीत विदर्भातील जनतेने भाजपला भरभरून मतांसह (carer)साथ दिली आहे. विदर्भातील 45 जागांच्या बळावर भाजपने कधी नव्हे एवढा 132 चा आकडा गाठला. त्यामुळेच विदर्भातील सर्वाधिक आमदारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता बळावली आहे. परंतु, सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांसोबतच नागपुरातील एक आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे समजते. याशिवाय मंत्रिमंडळाच्या पहिल्या शपथविधीमध्ये विदर्भातील तीन नवे चेहरेही दिसू शकतात. त्याचवेळी विदर्भातील एका जुन्या कॅबिनेटमंत्र्याची निराशा होणार असल्याची चर्चाही रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शपथविधीच्या पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांसह भाजप कोट्यातील 10 आमदार शपथ घेणार आहेत. यात विदर्भातील किती जण शपथ घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्तेचा मार्ग विदर्भातूनच जातो, असे मानले जाते. अशा स्थितीत विदर्भातील जनतेने भाजपला भरभरून दिले. आता भाजपची वेळ असल्याची चर्चा रंगली आहे. अधिकाधिक मंत्रिपद मिळावे व विदर्भातील जनतेला न्याय मिळावा, अशी कार्यकर्ते व जनतेला अपेक्षा आहे.
कुणबी आणि मराठ्यांना प्राधान्य
सुरुवातीच्या टप्प्यात कुणबी, मराठा आमदारांना अधिक महत्त्व दिले जाणार असल्याचीही माहिती मिळत आहे. जातीय समीकरण सोडवण्यात भाजप कोणतीही कसर सोडणार नाही. विदर्भातून या दोन समाजाच्या आमदारांना संधी मिळणार आहे. निवडणुकीपूर्वी भाजपने त्यांच्यावर मोठा डाव खेळला (carer)असून, अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाले आहे. त्यामुळे पक्षाला आता कोणताही धोका पत्करायचा नाही. समाजातील या घटकांना खूश करण्यावर भर राहणार आहे.
कृष्णा खोपडेंना मिळणार महामंडळ
ज्येष्ठ आमदार कृष्णा खोपडे यांना यावेळी पुन्हा मंत्रिपदासाठी प्रतीक्षा करावी लागू शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे. गेल्या वेळीही त्यांच्या नावाची बरीच चर्चा झाली होती. त्यामुळे त्यांना महामंडळ देण्याचा विचार केला जात आहे. त्यांना मोठे महामंडळ मिळणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. सध्या(carer) पक्ष खोपडे यांना आणखी नाराज ठेवणार नाही, असे बोलले जाते.
2 डिसेंबरला होणार शपथविधी सोहळा
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणि अनेक राजकीय घडामोडींनंतर अखेर महायुतीच्या शपथविधी कार्यक्रमाला मुहूर्त सापडल्याचे सांगण्यात येत आहे. 2 डिसेंबरला शपथविधी होणार असून, गृहमंत्रालय देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. मुख्यमंत्रिपदही फडणवीस यांना मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
हेही वाचा :
सावधान! तोंडावर ब्लॅंकेट घेऊन झोपाल तर…
आज मासिक शिवरात्री, भोलेनाथ ‘या’ राशींवर ठेवणार कृपादृष्टी!
लाडक्या बहिणींसाठी थोडी टेन्शन वाढवणारी बातमी, एकदा हे वाचा