सोशल मीडियावर व्हायरल होतोय EVM हॅकिंगचा व्हिडीओ
मुंबई: राज्य विधानसभा निवडणुकांच्या निकाल जाहीर झाल्यानंतर विरोधी पक्षांकडून इव्हीएमच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. निवडणुकांपूर्वी पासूनही इव्हीएम(EVM ) हॅक होत असल्याच्या चर्चाही सुरू होत्या. उपस्थित करण्यात आल्या आहेत.
त्यातच महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून इव्हीएमचा व्हिडीओ व्हायरल होत असून त्या व्हिडीओच्या आधारे अनेकांनी गंभीर आरोप केले आहेत. या व्हिडिओमध्ये एक हॅकरने इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन(EVM ) हॅक करू शकतो आणि काही राजकीय पक्षांच्या बाजूने निकाल बदलू शकतो, असा दावा केला आहे. हा व्हिडिओ अनेक लोकांनी आणि काही राजकीय नेत्यांनीही शेअर केला आहे.
हा व्हिडिओ ‘ एका वृत्तवाहिनीच्या स्पेशल इन्व्हेस्टिगेशन स्टोरी’ चा एक भाग असल्याचे सांगितले जात आहे. याठिकाणी या वृत्तपत्राच्या पत्रकारांनी एका वरिष्ठ खासदारासाठी काम करणारे गुप्त अधिकारी असल्याचे सांगून हे म्हणून स्टिंग ऑपरेशन केले. या व्हीडोओमध्ये अमेरिकन हॅकर सय्यद शुजाने तो यूएस डिफेन्स डिपार्टमेंटच्या तंत्रज्ञानाचा वापर करून ईव्हीएम हॅक करू शकतो आणि त्यासाठी त्याने 54 कोटी रुपयांची मागणीही केली होती.
ही बाबत गांभीर्याने घेत महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी एक निवेदन जारी केले आहे. एका सोशल मीडिया पोस्टमध्ये आयोगाने म्हटले आहे की, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हे दावे पूर्णपणे निराधार, खोटे आणि सिद्ध न झालेले आहेत. मुंबई सायबर पोलिसांनी या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे.
भारतीय न्यायिक संहिता, 2023 च्या कलम 318/4 आणि आयटी कायदा, 2000 च्या कलम 43 (सी) आणि कलम 66 (डी) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. ईव्हीएम पूर्णपणे छेडछाड प्रतिबंधक असून ते कोणत्याही नेटवर्कशी जोडले जाऊ शकत नाहीत, असे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे. सर्वोच्च न्यायालयानेही अनेकवेळा ईव्हीएमवर विश्वास व्यक्त केला आहे.
भारताच्या निवडणूक आयोगाने EVM वरील कोणत्याही शंका आणि गैरसमज दूर करण्यासाठी त्यांच्या वेबसाइटवर तपशीलवार FAQ प्रकाशित केले आहेत. खोट्या दाव्यांशी संबंधित अशाच एका घटनेत, दुसऱ्या देशात लपून बसलेल्या त्याच व्यक्तीविरुद्ध निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार 2019 मध्ये दिल्लीत एफआयआर नोंदवण्यात आला होता.
मतदारांना मतदान करण्यासाठी बटण दाबावे लागते. मतदान केंद्रावर हल्ला झाल्यास बनावट मतदान होऊ नये यासाठी मतदान अधिकारी बटण दाबून मशीन बंद करू शकतात. मतदानाशी संबंधित नोंदी ठेवणाऱ्या मशीनवर मेणाचा थर लावला जातो. यासोबतच निवडणूक आयोगाकडून येणारी एक चिप आणि अनुक्रमांकही त्यासोबत देण्यात आलेला असतो.
या मशीनचा वापर आतापर्यंत 113 विधानसभा निवडणुकीत करण्यात आला आहे. या मशिन्सच्या वापराने मतमोजणी लवकर होते. लोकसभा निवडणुकीतील मते केवळ तीन ते पाच तासांत मोजली जाऊ शकतात, तर बॅलेट पेपरच्या काळात हेच काम करण्यासाठी 40 तास लागायचे. यासह, मशीन बनावट मते वेगळे करते, ज्यामुळे अशा मतांची मोजणी करताना लागणारा वेळ आणि खर्च लक्षणीयरीत्या कमी झाला आहे.
या विषयावरील संशोधनातून असे समोर आले आहे की, मतदान यंत्राच्या वापरामुळे निवडणूक घोटाळे आणि मानवी चुका कमी झाल्या आहेत, ज्याचा लोकशाहीला फायदा झाला आहे.शिशिर देबनाथ, मुदित कपूर आणि शमिका रवी या संशोधकांनी 2017 मधील विधानसभा निवडणुकांशी संबंधित डेटावर संशोधन केल्यानंतर मतदान यंत्रांवर होणाऱ्या परिणामांवर शोधनिबंध सादर केला होता.
त्यांच्या संशोधनादरम्यान, या संशोधकांना असे आढळून आले की मतदान यंत्राच्या वापरामुळे निवडणुकीतील अनियमितता कमी झाली आहे, ज्यामुळे गरीबांना खुले मतदान करण्यास मदत झाली आहे आणि निवडणुका अधिक स्पर्धात्मक झाल्या आहेत.
हेही वाचा :
महागाईचा अजून एक धक्का! एसटी प्रवास ‘इतक्या’ टक्क्यांनी महागणार
ठाकरे गटात पुन्हा फूट पडणार? ‘या’ बड्या नेत्याचं खळबळजनक वक्तव्य
BSNL धमाकेदार प्रीपेड प्लॅन, परवडणाऱ्या किंमतीत मिळणार 160 दिवसांची व्हॅलिडीटी आणि बरचं काही