एकनाथ शिंदेंनी बोलवली आमदारांची बैठक? शिंदेंच्या गटात नेमकं चाललंय काय
मुंबई: महाराष्ट्राचा(political consulting firms) सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. दिललीत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्रिपद भाजपला मिळणार असल्याचे निश्चित झाले. पण त्याचवेळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात थेट गृहमंत्रिपद आणि नगरविकास खात्याची मागणी केली. भाजप ही दोन्हीही खाती कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे मुंबईत दाखल झाल्यानंतर थेटत्यांच्या गावी निघून गेले.
त्यानंतर एकनाथ शिंदे(political consulting firms) नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या, अखेर दोन-तीन दिवसांनंतर ते काल पुन्हा मुंबईला परतले. आज महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार असून आजच्या बैठकीत सत्तास्थापनेवर शेवटची चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे. पण त्याआधीच एकनाथ शिंदेंनी यांनीआपल्या आमदारांची बैठक बलवली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.
निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळूनही आठ दिवस उलटले तरी सरकार स्थापन झाले नाही. सत्ता स्थापनेचा दावाही करण्यात आलेला नाही. एकनाथ शिंदे आपल्या गृहमंत्रीपदाच्या मागणीवरून माघार घेतलेली नाही. त्यातच त्यांनी आज दुपारी त्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी किंवा नंदनवन याठिकाणी ही बैठक होण्याची शक्यता आहे. पण महायुतीच्या बैठकीआधीच त्यांनी आपल्या आमदारांची बैठक का बोलवली, अशीही शंका व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा :
रोहित शर्माच्या मुलाचं नाव जाहीर!
डिसेंबर महिन्यात बदलणार हे नियम; जाणून घ्या… अन्यथा बसू शकते खिशाला झळ!
‘उद्धव ठाकरे सोबत असते तर…’; सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू असताना भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य