‘तुझ्या आई-वडिलांना जीवे मारेन…’, 13 वर्षांच्या मुलीवर आजोबांकडून लैंगिक अत्याचार

राज्‍यात महिला अत्‍याचाराच्‍या घटना तर देशभरात अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांचे(crime) सत्र काही थांबायचे नाव घेत नाही. अशातच आता मुंबईतील पवई परिसरात नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली. मुंबईतील पवई परिसरात १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.

40 वर्षीय चुलत आजोबांनी 13 वर्षीय नातीवर लैंगिक(crime) अत्याचार केल्याची घटना घडली. याप्रकरणी पवई पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत अवघ्या काही तासांमध्ये त्याला अटक केली. या घटनेमुळे पवईमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी आरोपी आजोबाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. पवई पोलिसांनी सांगितले की, आरोपी हा पीडित मुलीच्या वडिलांचा मामा आहे.

पीडितेची आई कामावर गेल्यानंतर आरोपी गेल्या एक महिन्यापासून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. पीडितेसोबत गैरवर्तन केल्यानंतर आरोपीने हा प्रकार कोणाला सांगितल्यास तिच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे पीडित मुलगी घाबरली होती आणि त्यामुळेच तिने हा प्रकार कोणाला सांगितला नाही.

पीडित मुलीने पोटात दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर तिला जवळच्या डॉक्टरांकडे नेण्यात आले. तेव्हा कळले की त्यात काहीतरी गडबड आहे. घरच्यांनी मुलीकडे विचारणा केली असता मुलीने हा प्रकार घरच्यांना सांगितला. यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन याप्रकरणी तक्रार दाखल केली.

पवई पोलिसांनी आरोपीविरुद्ध लैंगिक अत्याचार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपी मूळचा बिहारचा आहे. सध्या ते पवई परिसरात राहतात.पोलीसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. अटकेनंतर पोलिसांनी आरोपीला कोर्टात हजर केले होते. कोर्टाने आरोपीची रवानगी पोलिस कोठडीत केली आहे. सध्या पीडित मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

यापूर्वी मुंबईतील अँटॉप हिल परिसरात तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचाराची घटना समोर आली होती. आरोपीने मुलीला निर्जनस्थळी नेऊन अत्याचार केला होता. मुलीला गंभीर अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या अँटॉप हिल पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले होते. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने मुलीला एका निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सातत्याने अत्याचाराच्या घटना घडत आहेत. मुंबईतील उच्चभ्रू संकुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सीएसएमटी परिसरात महिलांवरील अत्याचाराची अशी घटना घडल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. यानंतर मुंबईच महिलांसाठी असुरक्षित असल्याची भावना व्यक्त होत आहे. तसेच घटनांनंतर लवकरात लवकर कठोर नियम बनवून आरोपींना शिक्षा द्यावे, ही मागणी आहे.

हेही वाचा :

अलर्ट! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा तडाखा बसणार

दोघांची भांडण तिसऱ्याचा लाभ? मुख्यमंत्री ठरत नसताना अजित पवारांची दिल्लीवारी

स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही.सिंधू लवकरच अडकणार लग्नबंधनात