‘पुष्पा 2’ ची तिकिटे मिळत आहेत अर्ध्या किमतीत! आजच इथून Book करा
‘पुष्पा 2: द रुल’ या आगामी चित्रपटाचे(new film) तिकीट बुकिंग आता सुरू झाले आहे. या चित्रपटात दक्षिण भारतीय स्टार्स अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत आहेत. मागील वर्षापासूनच या चित्रपटाची फार चर्चा आहे. पुष्पा चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर चाहत्यांना याच्या दुसऱ्या पार्टची फार उत्सुकता लागून राहिली होती, अखेर ही उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे.
या चित्रपटाच्या(new film) तिकीट बुकिंगचे अनेक रेकॉर्ड मोडले गेले आहेत. दिल्ली, मुंबई, पाटणा, कोलकाता, बेंगळुरू आणि हैदराबाद सारख्या शहरांमध्ये या चित्रपटाच्या तिकिटाची किंमत 1800 रुपयांपर्यंत असू शकते, परंतु तुम्ही 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीत तिकीट खरेदी करू शकता. आता हे कसे करता येणार हे आज आम्ही तुम्ही तुम्हाला या लेखात सांगणार आहोत.
तुम्ही बुक माय शो ॲप किंवा वेबसाइटला भेट देऊन तिकीट बुक करू शकता. इथे तुम्हाला कमी किमतीत तुमच्या आवडीच्या सीटसह तिकीट बुक करता येईल. तुम्ही 2D, 3D, IMAX आणि इतर अनेक फॉरमॅटमध्ये तिकिटे बुक करू शकता. शोच्या वेळेनुसार आणि स्वरूपानुसार तिकिटांच्या किमती बदलतात.
काही बँकांच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे पेमेंट करून तुम्ही 50% पर्यंत सूट मिळवू शकता. पुष्पा 2 हा बहुचर्चित चित्रपट 5 डिसेंबर रोजी देशभर प्रदर्शित केला जाणार आहे. त्यामुळे चित्रपट पाहण्याचा विचार करत असाल तर अजिबात वेळ न घालवता आजच चित्रपटाचे बुकिंग कन्फर्म करा.
Paytm
पेटीएम हे एक लोकप्रिय ऑनलाईन पेमेंट ॲप आहे. इथे सर्व प्रकारचे बिल ऑनलाईन भरता येतात. तसेच इथे तुम्ही चित्रपटाचे तिकीट देखील बुक करू शकता. तुम्ही ॲक्सिस माय बँक झोन क्रेडिट कार्ड वापरून दोन तिकिटे बुक केल्यास, तुम्हाला एक तिकीट मोफत मिळेल.
PVR
तुम्ही PVR ॲप किंवा याच्या वेबसाइटवर जाऊनही तिकीट बुक करू शकता. दिल्ली आणि मुंबईच्या अनेक सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये जवळपास 100 रुपयांना तिकिटे उपलब्ध आहेत. दिल्लीच्या करोलबागमध्ये 70 रुपयांनाही तिकीट मिळतं.
District App
झोमॅटोच्या डिस्ट्रिक्ट ॲपवर तुम्हाला चांगल्या ऑफर देखील मिळू शकतात. तुम्ही Blinkit वरून 999 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या वस्तू ऑर्डर केल्यास तुम्हाला 200 रुपयांची सूट मिळेल, जी तुम्ही चित्रपटाची तिकिटे खरेदी करण्यासाठी वापरू शकता.
हेही वाचा :
“आपल्या देशात सेक्सला फार कमी महत्त्व…”, सई ताम्हणकरचं वक्तव्य चर्चेत
बळीराजाची चिंता वाढली, राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा!
गृहमंत्रिपदाऐवजी भाजपने एकनाथ शिंदेंसमोर दोन पर्याय ठेवले; उपमुख्यमंत्रिपदही घेणार?