भररस्त्यात हत्येचा थरार! मुलावर कोयत्याने सपासप वार, कारण वाचाल तर…
पुणे: शाळकरी मुलांमध्ये वादावादी होऊन एकमेकांच्या हत्येचा प्रयत्न होत असतानाच पुर्ववैमन्यासातून १७ वर्षीय एका मुलाचा दोघांनी भररस्त्यात कोयत्याने(sickle cell) सपासप वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. कॉलेजला जात असताना त्याला अडवून त्याच्यावर कोयत्याने वार केल्याचे सांगण्यात आले आहे.
भल्या सकाळी वानवडीतील रामटेकडी येथे मंगळवारी ही घटना घडली आहे. याघटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे(sickle cell). यश सुनील घाटे (वय १७, रा. रामनगर, रामटेकडी, हडपसर) असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी साहिल लतीफ शेख (वय १८) व ताहीर खलील पठाण (वय १८, रा. रामटेकडी, हडपसर) यांना अटक केली आहे. याबाबत वानवडी पोलीस ठाण्यात यशचा भाऊ प्रज्वल सुनील घाटे (वय २०) याने तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, यश घाटे हा हडपसर परिसरातील एका खासगी महाविद्यालयात शिकत होता. तर, आरोपी त्याच्याच परिसरात राहणारे आहेत. त्यांच्यात यापुर्वी वाद झाले होते. एकमेकांकडे पाहण्यावरून हे वाद झालेले होते. त्यावेळी यश याचा भाऊ प्रज्वल याने तो वाद मिटवला देखील होता.
या दरम्यान, मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास यश घाटे व त्याचे मित्र आदित्य चव्हाण, रेहान पठाण तसेच श्रेयश शिंदे असे जामा मस्जिदसमोरून रामटेकडी येथून कॉलेजला जात होते. त्यावेळी साहिल शेख व ताहीर पठाण यांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून यशला अडवले.
तसेच, त्याठिकाणी त्याच्याशी वाद घालत त्याच्यावर कोयत्याने सपासप वारकरून त्याची हत्या केला. भल्या सकाळी घडलेल्या याघटनेने परिसरात खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तर पसार झालेल्या साहिल व ताहीर यांना शोध घेऊन पकडले देखील. पुढील तपास वानवडी पोलीस करत आहेत.
हेही वाचा :
‘पुष्पा 2’ ची तिकिटे मिळत आहेत अर्ध्या किमतीत! आजच इथून Book करा
“आपल्या देशात सेक्सला फार कमी महत्त्व…”, सई ताम्हणकरचं वक्तव्य चर्चेत
बळीराजाची चिंता वाढली, राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा!