एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात राहणार की नाही?, फडणवीसांनी सगळं सांगून टाकलं

अखेर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरला आहे. देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. विधानभवनातील भाजप विधिमंडळ पक्ष कार्यालयात भाजपची कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला. यानंतर महायुतीची पत्रकार परिषद पार पडली, यावेळी फडणवीस यांनी एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात(cabinet) राहणार की नाही यावर मोठं वक्तव्य केलं. त्यांनी केलेल्या या वक्तव्याची सगळीकडे चर्चा रंगली आहे.

महायुतीच्या नेत्यांनी आज राजभवनात जावून महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. यानंतर तीनही नेत्यांनी पत्रकार परिषद घेत काही गोष्टींचा सस्पेन्स दूर केला आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे मंत्रिमंडाळात(cabinet) राहणार का? यावर प्रश्न उपस्थित केला जात होता. यावर देवेंद्र फडणवीस यांनी हा सस्पेन्स दूर केला आहे.

पत्रकार परिषदेत बोलत असताना, फडणवीस म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना मंत्रिमंडळात राहावं अशी विनंती केली. त्यांच्या आमदारांचीही तीच विनंती आहे. त्यांचा आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे, असं मोठं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात राहणार की नाही? याबाबतचा मोठा सस्पेन्स निर्माण झाला आहे.

तिघांची शपथ होईल. आणखी कोणाचा होणार हे आज संध्याकाळपर्यंत निर्णय घेऊ. कोण कोण शपथ घेणार याची माहिती संध्याकाळी देईल. गेल्या अडीच वर्षात आम्ही तिघांनी मिळून निर्णय घेतले आहे. पद ही तांत्रिक गोष्ट आहे. पण आम्ही यापुढेही तिघे मिळूनच निर्णय घेणार आहोत. राज्याला विकासाच्या मार्गावर नेणावर आहोत. जे आश्वासन दिले ते पूर्ण करण्यावर आमचा भर असेल, असंही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं.

हेही वाचा :

नागा चैतन्य-शोभिता आज विवाहबंधनात अडकणार

प्रेमसंबंधातून तरुणीवर वेळोवेळी अत्याचार; गर्भवती होताच गर्भपातही केला अन् नंतर…

भर रस्त्यात चोरांनी दागिने पळवताना महिलेसोबत घडलं असं काही…; घटनेचा VIDEO व्हायरल