लखनऊच्या नववधूने लग्नात घातली ‘बनारसी बिकनी’? Viral Photo

सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही विचित्र गोष्टी व्हायरल होत असतात. लोक व्हायरल होण्यासाठी वाटेल त्या थराला जाऊ पाहतात. हे व्हिडिओ लोकांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतात. कधी ते आपल्याला हसवतात तर कधी थक्क करून जातात. सध्या अशीच एक डोकं चक्रावून टाकणारी बाब सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. यात एका लग्नसोहळ्यातील (wedding) वर-वधूचा फोटो शेअर करण्यात आला आहे.

आता तुम्हाला वाटेल की, यात नक्की आश्चर्याची बाब काय आहे? पण आम्ही तुम्हाला सांगतो की, हा लग्नाचा फोटो काही साधासुधा नसून एक अनोखा फोटो आहे यातील दृश्ये तुम्ही याआधी कधीच कोणत्या लग्नात(wedding) पहिली नसावीत. चला तर मग यात नक्की काय आहे ते जाणून घेऊयात.

एका अजब-गजब लग्नसोहळ्याचा फोटो सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. या फोटोबाबत, अनेकांचा दावा आहे की, वधूने पिवळ्या रंगाची बनारसी बिकनी आपल्या लग्नात परिधान केली आहे.

बिकिनी घालून तिने आपले लग्न पूर्ण केले. असे मानले जाते की या महिलेने तिच्या लग्नाच्या दिवसासाठी असा ड्रेस निवडून लोकांच्या रूढीवादी विचारसरणीला आव्हान दिले आहे. आता बनारसी बिकिनीमध्ये मुलीने खरच लग्न केले का असा प्रश्न उपस्थित होत आहे. लखनौच्या मुलीने खरंच हे केलं आहे का? असा प्रश्न इंटरनेटवर अनेक युजर्स विचारत आहेत.

या व्हायरल फोटोमध्ये वधू लखनऊची असल्याचा दावा केला जात आहे. या फोटोमध्ये महिलेने पिवळ्या रंगाची बिकिनी घातली आहे आणि डोक्यावर ओढणी घेतली आहे. या जोडप्याने हातात पुष्पहार घेतला होता. वधूने यावेळी दागिने देखील परिधान केलेले दिसत आहेत. तिच्या हाताला आणि पायाला मेहंदी लावली आहे. या सर्व गोष्टी पाहून लोकांना वाटले की हे लग्नाचे चित्र आहे.

लोकांना यात सर्वात आश्चर्याची गोष्ट वाटली की, महिला भारतीय पारंपारिक विवाहसोहळ्यात बिकिनी घालून कशी काय आली? परंतु वस्तुस्थिती तपासताना हे व्हायरल चित्र बनावट असल्याचे समोर आले. ते AI च्या मदतीने तयार करण्यात आले आहे. खरे तर असा विवाह झालाच नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, व्हायरल फोटो रेडिटवर (Reddit) पोस्ट करण्यात आला होता. फोटोवर ‘लग्नाचा हंगाम’ असे कॅप्शन लिहिले आहे. यामध्ये अनेक फोटोज AI च्या मदतीने तयार करण्यात आले आहेत. वधूच्या कपड्यांबाबत वेगवेगळे दावे केले जात असताना या व्हायरल फोटोचा वाद आणखी वाढला. या फोटोमुळे आता सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. अनेकांनी वधूच्या कपड्यांवर जोरदार टीका केली होती. हे भारतीय संस्कृतीच्या विरोधात असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.

हेही वाचा :

एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात राहणार की नाही?, फडणवीसांनी सगळं सांगून टाकलं

प्रेमसंबंधातून तरुणीवर वेळोवेळी अत्याचार; गर्भवती होताच गर्भपातही केला अन् नंतर…

भर रस्त्यात चोरांनी दागिने पळवताना महिलेसोबत घडलं असं काही…; घटनेचा VIDEO व्हायरल