फडणवीसांना शुभेच्छा देणार पण, पहिल्या सारखं लफड्यात पडायचं नाही; जरांगेंनी सांगून टाकलं…

भाजपकडून(political updates) आज देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गट नेतेपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे उद्या देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे. आज महायुतीकडून राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे सरकार स्थापनेचा दावा करण्यात आला आहे.

तर दुसरीकडे मुख्यमंत्रीपदासाठी(political updates) देवेंद्र फडणवीस यांचे नाव जाहीर होताच मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर आपण त्यांना शुभेच्छा देऊ. असं म्हटले आहे. जरांगे पाटील आज जालन्यात पत्रकारांशी बोलत होते.

पत्रकारांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, सत्तेत कुणीही बसू दे मी आरक्षणासाठी भांडणार. यावेळी सरकारने मराठ्यांशी बेईमानी करायची नाही आणि आमच्या नादाला लागायचं नाही. तुम्हाला आरक्षण द्यावा लागणार आहे. आम्ही लई बहुमताने आलो, आमची सत्ता आली याच्या नादात पडायचं नाही.

मराठ्यांच्या मताशिवाय सत्तेत कुणी येवू शकत नाही. असं जरांगे पाटील म्हणाले. तसेच हल्ले करणार, पोरांवर केसेस करणार, रक्तपात करील, गोळ्या घालीन हे स्वप्न सरकारने आता सोडून द्यावे असा इशारा देखील माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी दिला.

पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, आम्हाला आरक्षण द्या नाहीतर एकदा मराठा रस्त्यावर उतरला ना मग कुणाच्या बापाला घाबरत नाही. आक्षणासाठी मी भांडणार आणि सोडणार सुद्धा नाही. सत्तेत कुणीही बसू द्या आरक्षणासाठी मी त्याला सोडणार नाही. असेही जरांगे पाटील म्हणाले. तसेच लाडक्या बहीण योजनेत सरकारनं जाचक अटी आणल्या आहे. ही सरकार एकपट देते आणि पाच पट घेते असा टोला देखील जरांगे पाटील यांनी लाडकी बहीण योजनेवरून सरकारला लावला.

सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही आरक्षणासाठी सामूहिक आमरण उपोषणाची तारीख जाहीर करणार आहे. तसेच उपोषण आझाद मैदानावर करायचा की नाही याचा निर्णय समाजाला विचारून करणार आहे असेही पत्रकारांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले. तसेच ओबीसींना मी कधी शत्रू मानलेलं नाही पण ओबीसी नेत्यांना सोडणार नाही कारण नेते कोणाचेच नसतात. आम्हाला विरोध करणारे दोन तीनच नेते आहेत, आम्हाला ओबीसी समाजाचा विरोध नाही. आज आपली लेकरं मोठी व्हावीत म्हणून मराठा समाज ताकदीने संघर्ष करत आहे. असं देखील जरांगे पाटील म्हणाले.

हेही वाचा :

संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा मऊसूत पनीर-बटाटा डोनट, लहान मुलं होतील खुश

प्रियंका चोप्रा 2025 मध्ये चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज

‘मी धोनीशी बोलत नाही, 10 वर्ष झाली…’ हरभजन सिंहचं MS Dhoni बाबत खळबळजनक वक्तव्य