मोदी सरकारची सर्वात मोठी Digital Strike! 59 हजार व्हॉट्सॲप अकाउंट्स केले Block

भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या I4C या संस्थेने सायबर गुन्हे रोखण्यासाठी कठोर पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत कंपनीने 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत, 1,700 पेक्षा जास्त स्काईप अकाऊंट आणि 59,000 पेक्षा जास्त व्हॉट्सॲप अकाउंट्स(WhatsApp accounts) ब्लॉक केले आहेत. ब्लॉक करण्यात आलेल्या व्हॉट्सॲप अकाउंट्स आणि स्काईप अकाऊंट्सचा सायबर गुन्ह्यांमध्ये समावेश होता. याबद्दल लोकसभेत माहिती देण्यात आली आहे. संस्थेच्या या निर्णयामुळे सायबर गुन्हे रोखण्यास मदत होणार आहे.

सायबर गुन्ह्यांपासून लोकांचे संरक्षण करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री बंदी संजय कुमार यांनी लोकसभेत ही माहिती दिली. याशिवाय 2021 मध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘सिटिझन फायनान्शियल सायबर फ्रॉड रिपोर्टिंग अँड मॅनेजमेंट सिस्टम’च्या मदतीने 9.94 लाखांहून अधिक तक्रारींचे निराकरण करण्यात आले असून 3434 कोटी रुपयांहून अधिकचे नुकसान टाळण्यात आले आहे.

I4C ने अनेक सायबर गुन्हेगारांचे व्हॉट्सॲप अकाउंट्स(WhatsApp accounts) ब्लॉक केले आहेत. यामध्ये 1700 हून अधिक स्काईप अकाऊंट आणि 59,000 हून अधिक व्हॉट्सॲप अकाउंट्स समाविष्ट आहेत. ही अकाउंट्स फसवणूक, लोकांची नकल आणि पैसे चोरण्यासाठी वापरली जात होती. मात्र या अकाऊंट्सबाबत कठोर निर्णय घेत ती ब्लॉक करण्यात आली आहेत. हे अकाऊंट्स डिजिटल फसवणूक आणि डिजिटल अटक यांसारख्या बेकायदेशीर कामांसाठी वापरले जात होते.

दूरसंचार कंपन्यांसह सरकारने विदेशातून येणारे बनावट कॉल थांबवण्यासाठी पावले उचलली आहेत. हे कॉल अनेकदा लोकांना फसवण्यासाठी वापरले जातात, जसे की खोट्या अटकेच्या नावाने किंवा सरकारी अधिकारी असल्याचा दावा करत लोकांची फसवणूक केली जाते. सरकारने दूरसंचार कंपन्यांना असे कॉल ओळखून ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत.

सायबर गुन्हे रोखण्यासाठी सरकारने सायबर फ्रॉड मिटिगेशन सेंटर (CFMC) या नवीन केंद्राची निर्मिती केली आहे. या केंद्रात बँका, वित्तीय कंपन्या, दूरसंचार कंपन्या, आयटी कंपन्या आणि पोलीस एकत्र काम करतील. अशा प्रकारे सर्व संघटना एकत्रितपणे सायबर गुन्ह्यांचा सामना करू शकतील.

केंद्रीय गृह राज्यमंत्री बंदी संजय कुमार यांनी असेही सांगितले की, भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्रांतर्गत 2021 मध्ये सुरू करण्यात आलेली ‘सिटिझन फायनान्शिअल सायबर फ्रॉड रिपोर्टिंग अँड मॅनेजमेंट सिस्टीम’ आर्थिक फसवणुकीचा तत्काळ अहवाल देण्यासाठी सक्षम असेल. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत सरकारने 6.69 लाखांहून अधिक सिमकार्ड आणि 1.32 लाख IMEI ब्लॉक केले आहेत.

मंत्र्यांनी माहिती दिली की केंद्र सरकार आणि दूरसंचार सेवा प्रदात्यांनी (टीएसपी) भारतीय मोबाइल नंबरची नकल करणारे आंतरराष्ट्रीय स्पूफ कॉल ओळखण्यासाठी आणि ब्लॉक करण्यासाठी एक प्रणाली विकसित केली आहे. इंटरनॅशनल स्पूफ कॉल ब्लॉक करण्याच्या सूचना TSP ला देण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त, एक अत्याधुनिक सायबर फ्रॉड मिटिगेशन सेंटर भारतीय सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर येथे स्थापित केले गेले आहे.

हेही वाचा :

राज्यात नव्या सरकारचा आज ग्रॅंड शपथविधी सोहळा

एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात राहणार का? अजित पवारांनी केलं मोठं विधान

Pushpa 2 ची क्रेज की वेडेपणा? अल्लू अर्जुनसमोरच लाठीचार्ज, चेंगराचेंगरीत अनेक जखमी; Video