शिवसेनासह राष्ट्रवादीच्या निमंत्रण पत्रिकेतही एकनाथ शिंदेंचं नाव नाही!

महाराष्ट्रातील ऐतिहासिक(political news) आझाद मैदानावर नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची चर्चा रंगत होती. मात्र शपथविधीच्या काही तास आधीच ट्विस्ट काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. याचदरम्यान एक बातमी समोर येते ती म्हणजे, महायुतीतील तिन्ही पक्षांच्या निमंत्रण पत्रिकेवरती एकनाथ शिंदे यांचं नाव नसल्याने आता चर्चेला उधाण आलं आहे.

शिवसेनेच्या(political news) निमंत्रण पत्रात एकनाथ शिंदे यांच्या नावाचा उल्लेख नसून फक्त फडणवीसांचे नाव लिहिले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या निमंत्रण पत्रात अजित पवार यांचे नाव स्पष्ट लिहिले आहे. याचा अर्थ एकनाथ शिंदे यांच्याबाबत अद्याप काहीही निर्णय झालेला नाही.

शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आज नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार हे निश्चित नाही. बुधवारी रात्रीपासूनच त्यांनी उपमुख्यमंत्री होण्यास होकार दिल्याच्या बातम्या येत होत्या, मात्र आज त्यांच्या पक्षाचे नेते उदय सामंत यांनी अद्याप निर्णय झालेला नसल्याचे सांगितले. याबाबत एकनाथ शिंदे लवकरच निर्णय घेतील, असे ते म्हणाले.

शिंदे सत्तेत सहभागी झाले नाहीतर, आम्हीही शपथ घेणार नाही. एकनाथ शिंदे जर सत्तेत सहभागी होणार नसतील तर शिवसेनेचे एकही आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार नाही, अशी भूमिका उदय सामंत यांनी घेतली असून त्यांच्या या भुमिकेमुळे आता शिवसेनेच्या सत्तेतील सहभागाबद्दल संभ्रम वाढवला.

शिंदे यांनी उपमुख्यमंत्री व्हावे, अशी शिवसेना नेत्यांची इच्छा आहे. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न ही केला जात आहे. त्यांची समजूत काढण्यासाठी उदय सामंत, संजय शिरसाट, संजय गायकवाड, भरत गोगावले, दीपक केसरकर हे शिंदे यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. यावेळी उदय सामंत म्हणाले की, शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी, अशी विनंती आहे. आमच्या ५९ आमदारांपैकी एकालाही उपमुख्यमंत्री होण्यात रस नाही. शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले नाही तर आम्ही मंत्रीपद स्वीकारणार नाही. त्याचवेळी शिंदे यांच्या उपमुख्यमंत्रीपदाबाबत तासाभरात निर्णय होणार आहे.

शिवसेना (political news)नेते संजय शिरसाट म्हणाले की, राजभवनातून परतल्यानंतर आम्ही सर्व आमदार काल एकनाथ शिंदे यांना भेटायला गेलो होतो. आम्ही त्यांना सरकारची शपथ घेण्याची विनंती केली आहे. सरकारचे अनेक महत्त्वाचे निर्णय आहेत ज्यात तुमचा सहभाग आवश्यक आहे.

शपथविधी सोहळ्याची निमंत्रण पत्रिका भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने तयार केली आहे. या तीन निमंत्रण पत्रिकांवर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा उल्लेख आहे. उपमुख्यमंत्रीपदासाठी शिंदे गटाच्या निमंत्रण पत्रिकेवर एकनाथ शिंदे यांचे नाव लिहिलेले नाही. अशा स्थितीत सस्पेन्स वाढला आहे. अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे राष्ट्रवादीच्या पत्रकात म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे बुधवारी राज्यपालांना पाठिंब्याचे पत्र सादर करण्यासाठी आले होते. यानंतर तिन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. ज्यात शिंदे म्हणाले की, मी शपथ घेणार की नाही ते सांगेन.

यानंतर सायंकाळी सात वाजता देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पोहोचले. ही बैठक सुमारे चाळीस मिनिटे चालली. या बैठकीत त्यांना गृहमंत्रालय दिले जात नसल्याचे सांगण्यात आले.

देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत आहेत. आझाद मैदानावर ते शपथ घेणार आहेत. या सोहळ्याला पंतप्रधान मोदीही उपस्थित राहणार आहेत. 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्या आणि 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर झाल्यानंतर सुमारे दोन आठवडे चर्चा सुरू राहिली आणि त्यानंतर आज फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणार आहे. 288 सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने 132 जागा जिंकून सर्वात मजबूत म्हणून पुढे आल्यानंतर फडणवीस या पदासाठी प्रबळ दावेदार म्हणून उदयास आले.

हेही वाचा :

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! PM किसानचा 19 वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार?

शपथविधिला काही तास बाकी असताना अजित पवारांचं मोठं स्टेटमेंट, चर्चांना उधाण!

अभिनय सोडल्याच्या बातम्यांदरम्यान विक्रांत मेस्सी शूटिंगसाठी सज्ज?