शपथविधी होताच वाहनचालकांना दिलासा, राज्यात पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त?

राज्यातील पेट्रोलच्या किमती या डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित (relief)असतात. त्यामुळे नियमितपणे त्यात सुधारणा केली जाते. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी असे अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. आज 6 डिसेंबररोजीचे इंधनदर सुधारले आहेत. आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किमती खाली सविस्तर दिल्या आहेत.

महाराष्ट्रात आज पेट्रोलची सरासरी किंमत 104.76 रुपये प्रतिलिटर आहे. मागच्या महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 6 नोव्हेंबररोजी पेट्रोलची सरासरी किंमत 104.85 रुपये प्रति लिटर होती, त्या तुलनेत आता किंमत 0.09 टक्क्यांनी कमी झाली आहे.तर, डिझेल 91.29 रुपये प्रति लिटर दराने (relief)विक्री होत आहे. काल 5 डिसेंबररोजी देखील महाराष्ट्रात डिझेलची किंमत सारखीच होती. म्हणजेच डिझेलच्या दरात कालपासून कोणताही बदल झाला नाही. मागच्या महिन्यात याच तारखेला डिझेलचे दर राज्यात 91.38 रुपये प्रति लिटर होते. या तुलनेत आता किंमत ही 0.09 टक्क्यांनी घसरली आहे. 

महाराष्ट्रात नुकतेच नवीन सरकार स्थापन झाले आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस हे नवे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले आहेत. तर, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. काल 5 डिसेंबर मुंबईतील आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडला. आता नवीन सरकारकडून (relief)वाहनचालकांना अनेक अपेक्षा आहेत. पुढील काळात राज्यात पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मेट्रो सिटीमधील इंधनदर

दिल्ली पेट्रोल प्रति लिटर 94.77 तर डिझेल 87.67
मुंबई पेट्रोल प्रति लिटर 104.76 तर डिझेल 91.29
कोलकाता पेट्रोल प्रति लिटर 104.95 तर डिझेल 91.76
चेन्नई पेट्रोल प्रति लिटर 100.75 तर डिझेल 92.34
बेंगलुरु पेट्रोल प्रति लिटर 99.84 तर डिझेल 85.93

हेही वाचा :

शिवसेनासह राष्ट्रवादीच्या निमंत्रण पत्रिकेतही एकनाथ शिंदेंचं नाव नाही!

‘माझ्या मुलाला सोडा’; इरफान खानच्या पत्नीची विनंती, मुलगा बाबिल Depression मध्ये

इतिहासाची अशीही पुनरावृत्ती! तेव्हा ठाकरे, आता शिंदे; पक्षप्रमुखांसमोर पेच, कारण तेच

‘मी धोनीशी बोलत नाही, 10 वर्ष झाली…’ हरभजन सिंहचं MS Dhoni बाबत खळबळजनक वक्तव्य