IND VS AUS मॅचमध्ये राडा, संतापलेल्या सिराजने ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूला बॉल फेकून मारला

टीम इंडिया(team india) सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून येथे ते 5 सामन्यांची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळत आहेत. टेस्ट सीरिजचा दुसरा सामना हा शुक्रवार 6 डिसेंबर पासून एडिलेड येथे सुरु झाला. या सामन्यात टॉस जिंकून फलंदाजी निवडलेल्या टीम इंडियाने पिंक बॉलचा सामना करताना 180 धावा केल्या.

तर ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसाअंती 1 विकेट गमावून 86 धावा केल्या, त्यामुळे टीम इंडिया(team india) सध्या 94 धावांनी आघाडीवर आहे. 2020 नंतर टीम इंडिया प्रथमच डे-नाइट टेस्ट सामना खेळत असून पहिल्याच दिवशी मैदानात मोठा राडा झाला. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने संतापाच्या भरात ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लाबुशेनला बॉल फेकून मारला.

मोहम्मद सिराजला तेव्हा राग अनावर झाला जेव्हा ऑस्ट्रेलियाच्या इनिंगवेळी तो 25 व्या ओव्हरचा शेवटचा बॉल टाकत होता. सिराज बॉल टाकत असताना मार्नस लाबुशेनने अचानक त्याला रोखले. सिराज रन-अप घेत होता तेव्हा लाबुशेनला साइट स्क्रीनच्या समोरून एक माणूस जाताना दिसला ज्यामुळे त्याचे लक्ष विचलित झाले आणि त्याने सिराजला रोखलं. तो व्यक्ती बियरचा ग्लास घेऊन जात होता. त्याने एकावर एक ठेवलेले ग्लास सापाप्रमाणे दिसत होते.

लाबुशेनने रन-अप दरम्यान सिराजला अचानक थांबवल्यामुळे सिराज संतापला आणि त्याने बॉल स्टंप्स पासून थोडा दूर लाबुशेनच्या दिशेने फेकला आणि त्यावेळी सिराजने काही अपशब्द देखील वापरले. मात्र पुढील बॉलवरच लाबुशेनने त्याला चौकार मारला. फलंदाजी करताना पहिल्या दिवसाअंती ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजाने 13 धावा केल्या. तर नाबाद नॅथन मॅकस्विनीने 38 आणि मार्नस लॅबुशेनने 20 धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसा अखेरीस 1 विकेट गमावून 86 धावा केल्या. जसप्रीत बुमराहने उस्मानची विकेट घेतली.

भारताची प्लेईंग 11 :
यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रोहित शर्मा (कर्णधार), नितीश रेड्डी, रविचंद्रन अश्विन, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

ऑस्ट्रेलियाची प्लेईंग 11 :
उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड

हेही वाचा :

विशेष अधिवेशनाला आजपासून सुरूवात:नवनिर्वाचित आमदार घेणार शपथ

बाईक चालवताना खिशातल्या मोबाईलचा स्फोट; भंडाऱ्यातील मुख्यध्यापकाचा मृत्यू! 

अजित पवारांना मोठा दिलासा; एक हजार कोटींची मालमत्ता मुक्त होणार