राज ठाकरे म्हणजे भाजपाच्या हातातलं खेळणं; फडणवीसांच्या ‘त्या’ विधानानंतर राऊतांची फटकेबाजी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या(political) पाठिंब्याबद्दल वक्तव्य केलं आहे. त्यावर आता संजय राऊत यांनी खोचक टीका केली आहे. राज ठाकरे हे भाजपाच्या हातातील खेळणं झालं आहेत, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

राज ठाकरेंना भाजपाकडून खेळवले जात आहे. राज ठाकरे(political) त्यांच्या हातातील खेळणं झालं आहेत, हे स्पष्ट दिसत आहे. काल देवेंद्र फडणवीस यांच्या विधानातून हे स्पष्ट झाले आहे की, भाजपा सांगेल त्या पद्धतीने राज ठाकरे भूमिका घेत आहेत. त्यांच्याविषयी आम्हाला आता काही बोलायचं नाही. लोकसभा, विधानसभा आणि आता महानगरपालिकेत मनसेने काय करावे? हे देवेंद्र फडणवीस ठरवत आहेत असंही राऊत म्हणाले आहेत.

एका बाजूला महाराष्ट्रामध्ये, मुंबईत मराठीत न बोलता गुजराती, मारवाडीत बोला असा भाजपाचा आग्रह आहे. मराठी लोकांवर दबाव आहे. त्या भाजपाचे नेतृत्व करणारे देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंनी काय भूमिका घ्यावी, राज ठाकरेंनी कुणाबरोबर जावं, हे पत्ते पिसत बसले असतील तर त्याबाबत राज ठाकरेंनी भूमिका व्यक्त केली पाहीजे, अशी टीका संजय राऊत यांनी केली. आम्ही महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, मराठी माणसाच्या हक्कांसाठी आणि महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शेवटपर्यंत लढत राहू, असंही ते म्हणाले.

हेही वाचा :

बाईक चालवताना खिशातल्या मोबाईलचा स्फोट; भंडाऱ्यातील मुख्यध्यापकाचा मृत्यू! 

विशेष अधिवेशनाला आजपासून सुरूवात:नवनिर्वाचित आमदार घेणार शपथ

IND VS AUS मॅचमध्ये राडा, संतापलेल्या सिराजने ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूला बॉल फेकून मारला