लाडक्या बहिणींना ७५०० मिळालेच नाहीत, पुन्हा अर्ज करता येणार?
महायुती सरकारची महत्त्वकांशी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये जालना (benefits)जिल्ह्यातील 5 लाख 42 हजार लाडक्या बहिणींना लाभ मिळाला आहे. मात्र जवळपास सात लाडक्या बहिणी लाभापासून अद्यापही वंचित आहेत. जालना ,बदनापूर, भोकरदन, परतुर, घनसावंगी या तालुक्यातील 5 लाख 42 हजार लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळाला आहे. जवळपास सात हजार लाडक्या बहिणी अद्यापही लाभापासून वंचित असल्याच पाहायला मिळतेय.
जालना जिल्ह्यात जवळपास सात हजार लाडक्या बहिणी योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्या आहेत. दरम्यान बँकेमध्ये लाभार्थी महिलांचे आधार लिंक झालेले नसल्याने हे पैसे त्यांना (benefits)मिळाले नाहीत. दरम्यान बँक खात्याला आधार लिंक झाल्यानंतर राहिलेल्या महिलांना पैसे मिळतील अशी माहिती महिला व बालविकास अधिकारी कोमल कोरे यांनी दिली आहे.
जालना जिल्ह्यात एकूण 5 लाख 42 हजार लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे. जालना जिल्ह्यात जालना तालुक्यात सर्वाधिक 1 लाख 33 हजार 31 एवढ्या लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळाला आहे. तर सर्वाधिक कमी जाफराबाद तालुक्यात 44 हजार 920 एवढ्या (benefits)लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळाला आहे
1) अंबड : 73 हजार 465
2) जालना : 1 लाख 33 हजार 31
3) बदनापूर : 45 हजार 167
4)भोकरदन : 86 हजार 051
5) जाफ्राबाद : 44 हजार 920
6) मंठा : 45 हजार 821
7) परतूर : 50 हजार 529
8) घनसावंगी : 63 हजार 381
हेही वाचा :
विशेष अधिवेशनाला आजपासून सुरूवात:नवनिर्वाचित आमदार घेणार शपथ
IND VS AUS मॅचमध्ये राडा, संतापलेल्या सिराजने ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूला बॉल फेकून मारला
राज ठाकरे म्हणजे भाजपाच्या हातातलं खेळणं; फडणवीसांच्या ‘त्या’ विधानानंतर राऊतांची फटकेबाजी