फ्रीमध्ये मिळणार यूट्यूब प्रीमियमचा आनंद, हा ब्राऊझर करणार तुम्हाला मदत
व्हिडीओ स्ट्रीमइंग प्लॅटफॉर्म यूट्यूबचा जगभरात वापर केला जातो. यूट्यूबवर(Premium) तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहू शकता. ज्यामध्ये रेसिपी, एज्युकेशन, स्पोर्ट्स, एन्टरटेन्मेंट, यांचा समावेश केला जाऊ शकतो. यूट्यूबवर तुम्हाला सर्व काही केवळ एका क्लिकवर उपलब्ध होते. पण यूट्यूबवर व्हिडीओ पाहताना खूप जाहिराती पहव्या लागतात. यामुळे व्हिडीओ पाहताना खूप वैताग येतो.
तुम्हाला जाहिरात शिवाय यूट्यूबवर व्हिडीओ पाहायचे असतील तर तूम्ही यूट्यूब प्रिमियम(Premium) मेंबरशीप खरेदी करू शकता. पण प्रचंड किमतीमुळे ही मेंबरशीप खरेदी करणं प्रत्येकाला शक्य नसतं. पण आता आम्ही तुम्हाला अशा एका ब्राऊझरबद्दल सांगणार आहोत, जो तुम्हाला फ्रिमध्ये यूट्यूब प्रिमियमचा आनंद देणार आहे.
तुम्हाला यूट्यूब प्रिमियम प्रमाणे व्हिडिओ पाहायचे असतील, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तथापि, असा एक मार्ग आहे ज्याद्वारे तुम्ही एक रुपयाही खर्च न करता यूट्यूब प्रिमियम प्रमाणे जाहिरातमुक्त कंटेंट पाहण्याचा आनंद घेऊ शकता. होय, तुम्हाला यूट्यूब प्रिमियम मेंबरशीपसाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही आणि विनामूल्य यूट्यूब प्रिमियमचा आनंद घेता येईल.
तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर Brave Incognito Browser डाउनलोड करू शकता. हा ब्राऊझर तुम्हाला जाहिरात शिवाय यूट्यूब व्हिडिओ पाहण्यासाठी मदत करणार आहे. ब्रेव्ह (ब्रेव्ह प्रायव्हेट वेब ब्राउझर, व्हीपीएन) हे एआय सह ॲडब्लॉक व्हीपीएन आहे. ब्रेव्ह ब्राउझर पूर्णपणे सुरक्षित आहे. तुम्ही टेन्शन फ्री वापरू शकता. ब्रेव्ह ब्राउझर कसे कार्य करते ते आम्ही तुम्हाला आता सांगणार आहोत.
- ब्रेव्ह प्रायव्हेट वेब ब्राउझर उपयुक्त आहे.
- तुम्ही Play Store वरून Brave Private Web Browser ॲप डाउनलोड करू शकता.
- ॲप डाउनलोड केल्यानंतर, ते ओपन करा.
- आता तुम्ही क्रोम ब्राउझरऐवजी ते वापरा.
- Brave Private Web Browser च्या सर्च वर जा आणि YouTube टाइप करा.
- यानंतर यूट्यूबच्या होम पेजवर जाऊन तुम्ही कोणत्याही जाहिरातीशिवाय व्हिडिओचा आनंद घेऊ शकता.
- जर तुम्हाला हा वेब ब्राउझर डीफॉल्ट ब्राउझर बनवायचा नसेल, तर तुम्हाला ॲपच्या मेनूमध्ये जाऊन Add To Home Screen वर टॅप करावे लागेल.
- यानंतर हे ॲप YouTube वर जाहिरातमुक्त अनुभव देण्यासाठी पूर्णपणे तयार होईल.
गुगल प्ले स्टोअरवर अनेक ॲड ब्लॉकर ॲप्स उपलब्ध आहेत, ज्यांना काही परवानग्या आवश्यक आहेत. हे केल्यानंतर, जाहिराती मोठ्या प्रमाणात ब्लॉक केल्या जातात. ॲडवे ॲपचा वापर जाहिराती ब्लॉक करण्यासाठी केला जाऊ शकतो. Adblock Plus हे देखील असेच एक ॲप आहे, जे तुम्हाला कोणत्याही खर्चाशिवाय जाहिरातमुक्त अनुभव देऊ शकते. Adguard ॲपही तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. हे ॲप ऍक्सेस करायला खूप सोपे आहे आणि त्याचा यूजर इंटरफेसही सोपा आहे.
हेही वाचा :
थंडी परतणार! येत्या 24 तासात महाराष्ट्रातील वातावरण बदलणार
एक नाही तर तब्बल 9 आयपीओ खुले होणार; पुढील आठवड्यात कमाईची मोठी संधी!
‘विरोधी पक्षाचा पूर्ण सफाया, ६५ वर्षांत असं कधीच घडलं नाही…’, मविआ नेत्याचे सूचक वक्तव्य