वजन कमी करण्यासाठी खास सूप; सोपी रेसिपी जाणून घ्या
हिवाळ्यात सूपचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते. सूपची गरम वाटी बघून (corn recipe)आपला दिवस चांगला जातो. पण तुम्हाला माहित आहे का की सूपचे सेवन केल्याने होण्यासही मदत होते. जर तुम्ही वाढलेल्या वजनाने त्रस्त असाल आणि वजन कमी करायचे असेल तर तुम्ही हे सूप करून पाहू शकता.आज आम्ही तुम्हाला स्वीट कॉर्न सूपबद्दल सांगत आहोत ज्याचा तुम्ही हिवाळ्याच्या आहारात वजन कमी करण्यासाठी समावेश करू शकता. स्वीट कॉर्न सूपमध्ये व्हिटॅमिन ए, बी, ई, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात.
याशिवाय यामध्ये असलेले फायबर पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. यामध्ये असलेले फायटोकेमिकल्स अनेक प्रकारच्या आजारांपासून संरक्षण करू शकतात. चला तर मग जाणून घेऊया हे सूप कसा बनवायचे.हे सूप बनवण्यासाठी प्रथम एका पॅनमध्ये आले, लसूण, कोथींबीर आणि हिरवी(corn recipe) मिरची टाका आणि काही मिनिटे परतून घ्या. काळी मिरी आणि मीठ घालून कॉर्न आणि इतर भाज्या घाला आणि थोडा वेळ परतून घ्या. त्यात सोया सॉस, पाणी आणि मीठ घाला आणि उकळू द्या, आच मंद करा आणि पाण्यात कॉर्न फ्लोअर घाला, मिक्स करा आणि घट्ट होईपर्यंत सतत ढवळत राहा, नंतर त्यात कोबी घाला. आचेवरून काढून गरमागरम सर्व्ह करा.
स्वीट कॉर्नमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही तुमच्या आहारात स्वीट कॉर्न सूपचा समावेश करू शकता.(corn recipe) यामध्ये ओमेगा ३ फॅटी ॲसिड असते. ज्यामुळे हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका कमी होतो. हा फायबरचा चांगला स्रोत मानला जातो. बद्धकोष्ठता, गॅस आणि ॲसिडिटीच्या समस्याही या सूपच्या सेवनाने दूर होतात.
हेही वाचा :
थंडी परतणार! येत्या 24 तासात महाराष्ट्रातील वातावरण बदलणार
एक नाही तर तब्बल 9 आयपीओ खुले होणार; पुढील आठवड्यात कमाईची मोठी संधी!
‘विरोधी पक्षाचा पूर्ण सफाया, ६५ वर्षांत असं कधीच घडलं नाही…’, मविआ नेत्याचे सूचक वक्तव्य