थंडीत पाठदुखी वाढते? औषधांऐवजी ‘या’ नैसर्गिक उपायांनी करा वेगाने बरे
राज्यभरात सगळीकडे थंडीचे वारे वाहू लागले आहेत. थंडी वाढल्यानंतर अनेक(cold) ठिकाणी शेकोटी सुद्धा पेटवली जाते. आपल्यातील अनेकांना हिवाळा ऋतू खूप आवडतो. मात्र याचं ऋतूंमध्ये सर्वाधिक आजार वाढू लागतात. सतत ताप येणे, सर्दी किंवा खोकला येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. थंडीमध्ये पाठ दुखणे, कंबर दुखणे, हाडांचे दुखणे वाढू लागते. पाठ दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. सतत बदलत चाललेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये होणारे बदल, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींमुळे आरोग्य बिघडण्यास सुरुवात होते.
शिवाय वाढलेल्या वजनाचा परिणाम पाठीच्या मणक्यावर लगेच दिसून येतो. एखादी वस्तूं खाली वाकून उचलताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पाठ दुखीच्या वेदनांपासून अराम मिळवण्यासाठी कोणते उपाय करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
पाठ दुखीच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी सोपी उपाय:
स्ट्रेचिंग करणे:
सकाळी उठल्यानंतर नियमित स्ट्रेचिंग केल्यामुळे पाठ दुखीच्या समस्येपासून आराम मिळण्यास मदत होईल. पाठ दुखीची समस्या उद्भवल्यानंतर अनेक वेदनांना सामोरे जावे लागते. नियमित स्ट्रेचिंग केल्यामुळे पाठीचे स्नायू लवचिक आणि मजबूत होण्यास मदत होते. नियमित स्ट्रेचिंग करताना तुम्ही काऊ- कॅट पोझ(cold) आणि चाइल्ड पोज योगासने करू शकता. यामुळे पाठ दुखीपासून आराम मिळेल.
योगासने करणे:
निरोगी आरोग्यासाठी नियमित योगासने करणे आवश्यक आहे. नियमित योगासने केल्यामुळे शरीराचे स्नायू लवचिक आणि मजबूत होण्यास मदत होते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर किंवा इतर वेळी नियमित योगासने करणे आवश्यक आहे. पण पाठीवर जास्त ताण येईल अशी योगासने करू नये. तीव्र पाठदुखी होत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे.
योग्य पद्धतीने बसणे:
चुकीच्या पद्धतीने बसल्यामुळे पाठ दुखीची समस्या उद्भवू लागते. त्यामुळे खाली बसताना किंवा इतर वेळी कुठेही खाली बसताना योग्य आसनात बसावे, ज्यामुळे पाठीला वेदना होणार नाहीत. दिवसभर लॅपटॉपवर काम करताना अनेक लोक व्यवस्थित ताठ बसतात, ज्यामुळे त्यांच्या पाठीला कुठलीही(cold) वेदना होत नाही.
योग्य उशीचा वापर करणे:
झोपताना किंवा इतर वेळी बसताना अनेकांना उशी घेऊन बसण्याची सवय असते. पण चुकीच्या पद्धतीची उशी निवडल्यामुळे पाठ दुखीचा त्रास होऊ लागतो. झोपताना काहींना जास्त जाड असलेली उशी लागते, पण जाड आणि वजनदार उशी वापरल्यामुळे पाठ आणि मानेची समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे रात्रीच्या वेळी झोपताना योग्य उशीचा वापर करावा.
हेही वाचा :
थंडी परतणार! येत्या 24 तासात महाराष्ट्रातील वातावरण बदलणार
एक नाही तर तब्बल 9 आयपीओ खुले होणार; पुढील आठवड्यात कमाईची मोठी संधी!
‘विरोधी पक्षाचा पूर्ण सफाया, ६५ वर्षांत असं कधीच घडलं नाही…’, मविआ नेत्याचे सूचक वक्तव्य