उपवासासाठी खास: कुरकुरीत भजी तयार करण्याची सोपी रेसिपी

संकष्टी चतुर्थीला सर्वच महिला आणि पुरुष उपवास करतात. उपवासाच्या (prepared)दिवशी घरात नाश्त्यासाठी साबुदाणा खिचडी, बटाट्याची भाजी, वरीचा भात इत्यादी पदार्थ बनवले जातात. पण या पदार्थांच्या सेवनामुळे पित्ताचा किंवा अपचनाचा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे उपवासाच्या दिवशी पचनास हलके असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. यामुळे पोटही भरते आणि आरोग्यसुद्धा फायदे होतात. सतत तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा निर्माण होते

अशावेळी तुम्ही सकाळच्या नाश्त्यात किंवा दुपारच्या वेळी उपवासाची भजी बनवू शकता. उपवासाची भजी चवीला अतिशय सुंदर लागते. थंडी वाढल्यानंतर सगळ्यांचं काहींना काही गरम (prepared)पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाण्यापेक्षा घरी बनवलेले पदार्थ खावेत. चला तर जाणून घेऊया उपवासाची भजी बनवण्याची सोपी रेसिपी.

साहित्य:

  • उकडलेला बटाटा
  • मीठ
  • हिरवी मिरची
  • काळीमिरी पावडर
  • पाणी
  • तेल
  • साबुदाणा पावडर

कृती:

  • उपवासाची भजी बनवण्यासाठी सर्वप्रथम, उकडवून थंड करून घेतलेले बटाट्यांची साल काढून व्यवस्थित मॅश करून घ्या.
  • त्यानंतर साबुदाणा पावडर, बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घ्या.
  • नंतर त्यात काळीमिरी पावडर आणि आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्या.
  • त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. (prepared)गरम तेलात तयार केलेल्या पिठाच्या भजी टाकून दोन्ही बाजूने व्यवस्थित तळून घ्या.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली उपवासाची भजी. ही भजी तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता.

हेही वाचा :

तरच 2100 रुपये मिळणार?’; लाडक्या बहीणींनो ‘या’ 6 गोष्टी लगेच चेक करा

मनोज जरांगे नव्या वर्षात करणार धमाका?, केली मोठी घोषणा

थंडीत पाठदुखी वाढते? औषधांऐवजी ‘या’ नैसर्गिक उपायांनी करा वेगाने बरे