गारठा वाढला: किमान तापमान 14 अंश सेल्सिअसवर घसरलं
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. (degrees)त्यात दोन दिवसांपासून मुंबईकरांना गुलाबी थंडीचा सामना करावा लागत आहे. असे असताना मुंबईच्या किमान आणि कमाल तापमानात घट झाली आहे. त्या तुलनेत उपनगरात पारा अधिक घसरला असून, सोमवारी उपनगरात किमान तापमान 14 अंश सेल्सिअस होते. त्यामुळे मुंबईचे किमान तापमान आणखी घसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेल्या आठवड्यात कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसच्या आसपास तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअसच्या वर नोंदले गेले होते. मात्र, रविवारपासून त्यात घट होऊ लागली. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईकर कडाक्याच्या थंडीचा सामना करत आहेत. सोमवारी हवामान खात्याच्या सांताक्रूझ केंद्रावर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस, तर कुलाबा केंद्रावर 19.8 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदवले गेले.
तर उपनगरात अनेक ठिकाणी किमान तापमानात घट नोंदवण्यात आली. पुढील तीन ते चार दिवस तापमानात घसरण कायम राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. या काळात किमान तापमान 15 ते 16 अंशांच्या दरम्यान राहील. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांची तीव्रता वाढल्याने राज्यात(degrees)थंडीचा जोर वाढला आहे. अनेक ठिकाणी थंडीची लाट आली असून, राज्यात थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.मुंबई शहर आणि उपनगरात प्रदूषण वाढत आहे. सोमवारी मुंबईत सर्वाधिक प्रदूषण नेव्ही नगर-कुलाबा येथे झाले. तेथील हवा निर्देशांक 315 होता. मुंबईत एकीकडे थंडी वाढत असताना दुसरीकडे हवेचे प्रदूषणही वाढत आहे. मोठ्या प्रमाणावर होणारी विकासकामे आणि वाहनांच्या प्रदूषणामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता घसरत आहे.
काश्मीरसह जम्मूमध्येही कडाक्याची थंडी आहे. काश्मीरच्या सर्व भागात तापमान गोठणबिंदूच्या खाली कायम आहे. रविवारी रात्री श्रीनगर शहरातील तापमान उणे ३.४ अंश सेल्सिअस होते. रात्रीही पारा याच बिंदूवर होता. जम्मूमध्येही किमान तापमान पाच अंशांवर राहिले. मात्र, जम्मूमध्ये दिवसभर (degrees)उन्हामुळे थोडासा दिलासा मिळाला.बुधवारी दि. 17 दार्जिलिंगमधील हवामानात बदल दिसून आला आहे. यामध्ये भारतीय हवामान विभाग IMD नुसार, १६.०°C कमाल आणि ८.०°C किमान तापमान पाहिला मिळाले. 93 च्या AQI रीडिंगसह हवा बऱ्यापैकी स्वच्छ दिसून आली. परंतु, दार्जिलिंग आज दाट धुक्यात बुडाल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले.
हेही वाचा :
तरच 2100 रुपये मिळणार?’; लाडक्या बहीणींनो ‘या’ 6 गोष्टी लगेच चेक करा
मनोज जरांगे नव्या वर्षात करणार धमाका?, केली मोठी घोषणा
थंडीत पाठदुखी वाढते? औषधांऐवजी ‘या’ नैसर्गिक उपायांनी करा वेगाने बरे