मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरु…

मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर गुन्हे (parlor)शाखेने छापा टाकून पर्दाफाश केला. तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मसाज पार्लरच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला आहे. लोकेश राजकुमार पुरी वय २३, रा. चौधरी वस्ती, खराडी असे गु्न्हा दाखल केलेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे. याबाबत गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागातील सहायक फौजदार छाया जाधव यांनी खराडी चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, खराडीतील राजाराम पाटीलनगर परिसरातील एका इमारतीत मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली. या माहितीची खातरजमा करण्यात आली. बनावट ग्राहकाने खात्री केल्यानंतर पोलीस पथकाने तेथे छापा टाकला. तेव्हा मसाज पार्लरमधून तरुणींना ताब्यात घेतले. चौकशीत मसाज पार्लरच्या नावाखाली आरोपी पुरीने(parlor)तरुणींना पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याचे उघडकीस आले. वरिष्ठ निरीक्षक संजय चव्हाण तपास करत आहेत.

शहरात मसाज पार्लरच्या नावाखाली शेकडो स्पाच्या माध्यमातून वेश्या व्यावसाय चालविला जात आहे. शहरात हा वेश्या व्यावसाय चालविणारे मोठे रॅकेट सक्रिय आहे. यामध्ये एका महिला दलालाचा देखील समावेश आहे. तिघांबाबत पोलिसांना माहिती आहे, परंतु, प्रत्यक्षात गुन्ह्यात देशील समावेश होत नसल्याने त्यांना पोलिसांच्या कारवाला किती महत्व द्यायचे हे माहिती आहे. दरम्यान, अनेक पुणेकरांनी पोलीस आयुक्त (parlor)अमितेश कुमार यांना या गैरप्रकाराबाबत माहिती दिली होती. त्यानंतर आयुक्तांन याअवैध धंद्यावर कारवाई करण्यासोबतच ते कायम बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

पुण्यात गुन्हेगरीचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. पुणे पोलीस देखील गुन्हेगारी रोखण्यासाठी कठोर पावले उचलताना दिसत आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसाखाली पुण्यात नोकरीच्या आमिष दाखवत तरुणींना पुण्यात आणून त्यांना वेश्या व्यवसायाला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधवार पेठेतील कुंटणखान्यात छापा कारवाई करून तब्बल अशा ५ तरुणींची सुटका केली आहे. ५ पैकी दोन तरुणींना त्यांच्याच पतीने पुण्यात आणून वेश्या व्यवसायाला लावल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

हेही वाचा :

तरच 2100 रुपये मिळणार?’; लाडक्या बहीणींनो ‘या’ 6 गोष्टी लगेच चेक करा

मनोज जरांगे नव्या वर्षात करणार धमाका?, केली मोठी घोषणा

थंडीत पाठदुखी वाढते? औषधांऐवजी ‘या’ नैसर्गिक उपायांनी करा वेगाने बरे