एसी लोकलच्या लेडीज डब्यात मनोरुग्ण नग्नावस्थेत; व्हिडिओ व्हायरल

रोज सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यात मुंबई लोकलचे (sj train)अनेक व्हिडिओ असतात. मुंबई लोकलमधील हाणामारीचे, महिलांच्या भांडणाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. परंतु सध्या सोशल मीडियावर संतापजनक व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असणाऱ्या व्हिडिओत एक मनोरुग्ण एसी लोकलच्या लेडीज डब्यात नग्न अवस्थेत चढला आहे. मनोरुग्ण अचानक लेडीज डब्ब्यात आल्याने महिलांना खूप भीती वाटली. लेडीज डब्ब्यात खूप आरडाओरडा झाला

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ घाटकोपर रेल्वे स्थानकावरचा आहे. घाटकोपर रेल्वे स्थानकावर एसी लोकल थांबलेली तेव्हा हा मनोरुग्ण नग्न अवस्थेत चढला.सोमवारी दुपारी १६ डिसेंबर २०२४ ही घटना घडली. चार वाजून अकरा मिनिटांनी कल्याण एसी लोक घाटकोपर स्थानकावर थांबली. ट्रेन स्टेशनवर (sj train)आल्यावर लगेचच हा मनोरुग्ण या डब्यात चढला. हा व्यक्ती लोकलमध्ये चढताच खूप आरडाओरडा झाला. मात्र, त्याला वाचवायला कोणीच आले नाही.

दरम्यान, मोटरमॅनने लोकल थांबवली. त्यावेळी बाजूच्या डब्यात टीसी होता. टीसीने मनोरुग्णाला बाहेर काढले. हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर संतापजनक प्रतिक्रिया(sj train) येत आहे. अचानक महिलांच्या डब्यात हा प्रकार घडल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासन काय करणार असे प्रश्न विचारले जात आहेत.

हेही वाचा :

तरच 2100 रुपये मिळणार?’; लाडक्या बहीणींनो ‘या’ 6 गोष्टी लगेच चेक करा

मनोज जरांगे नव्या वर्षात करणार धमाका?, केली मोठी घोषणा

थंडीत पाठदुखी वाढते? औषधांऐवजी ‘या’ नैसर्गिक उपायांनी करा वेगाने बरे