72 तासांनंतर अजित पवार संपर्कात; राजकीय चर्चा थांबल्या
राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर लगेचच हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे.(since) निवडणुकीनंतर हे पहिलेच अधिवेशन असल्यामुळे जोरदार रंगले आहे. त्यामुळे नागपूरमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार वादंग निर्माण झाला आहे. यामध्ये हिवाळी अधिवेशन सुरु होऊन देखील दोन दिवस उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहत नसल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले होते. आता अखेर 72 तासानंतर अजित पवार हे परतले आहेत.
महायुतीमध्ये बहुमत मिळून देखील सत्तास्थापन आणि मंत्रीमंडळ विस्तार अशा अनेक मुद्द्यांवरुन विलंब झाला आहे. तसेच नेत्यांमध्ये नाराजीनाट्य देखील सुरु झाले आहे. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये संधी न मिळाल्यामुळे अनेक बडे नेते नाराज आहेत. यामध्ये अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे देखील नाराज आहेत. त्याचबरोबर अजित पवार हे देखील दोन दिवस सभागृहाच्या कामकाजामध्ये सहभागी झाले नव्हते. तसेच त्यांच्याशी संपर्क होत नसल्याचे वृत्त समोर आले होते. आता मात्र अजित पवार हे नागपूरमध्ये दाखल झाले आहेत.
नागपूरमध्ये अजित पवार दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. अनेक कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांची भेट घेतली. तसेच उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल .(since)शुभेच्छा देखील दिल्या आहेत. त्याचबरोबर बीड प्रकरणात आरोप करणारे भाजप आमदार सुरेश धस यांनी देखील अजित पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आता अजित पवार हे कामाला लागले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अजित पवार हे मागील दोन दिवसांपासून विधानसभा कामकाजामधून देखील गायब होते. आता अजित पवार हे दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर कामावर रुजू झाले आहेत. यामध्ये मंत्री आदिती तटकरे यांच्यासोबतच्या भेटीचा फोटो देखील समोर आला आहे. दोन दिवस संपर्क होत नसल्यामुळे चर्चांना उधाण आले होते. आता मात्र अजित पवार यांच्याशी संपर्क न लागल्यामुळे चर्चांना उधाण आले होते. आता मात्र अजित पवार समोर आल्यामुळे सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे विधानभवनच्या दिशेने रवाना देखील झाले आहेत. त्यामुळे आजच्या कामकाजामध्ये अजित पवार हे सहभागी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यापूर्वी त्यांच्या घशाच्या संसर्गामुळे ते सहभागी झाले नव्हते. आता मात्र अजित पवार हे सहभागी होणार असल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे देखील नाराज आहेत. त्यामुळे आता छगन भुजबळ यांची समजूत काढली जाणार असून ते आपली नाराजी सोडणार का याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे. मंत्रिपद न मिळाल्यामुळे .(since)छगन भुजबळ यांनी थेट माध्यमांसमोर आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व पक्षाचे अध्यक्ष अजित पवार हे छगन भुजबळांची नाराजी दूर करण्यामध्ये यशस्वी होतात की नाही याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
हेही वाचा :
तरच 2100 रुपये मिळणार?’; लाडक्या बहीणींनो ‘या’ 6 गोष्टी लगेच चेक करा
मनोज जरांगे नव्या वर्षात करणार धमाका?, केली मोठी घोषणा
थंडीत पाठदुखी वाढते? औषधांऐवजी ‘या’ नैसर्गिक उपायांनी करा वेगाने बरे