एकनाथ शिंदेंकडे गृहनिर्माण, अजित पवारांकडे अर्थ; देवेंद्र फडणवीसांकडे कोणतं खातं?

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 15 डिसेंबरला झाला. महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. त्यानंतर आता कोणाला कोणती मंत्रि‍पदाची (Political)कोणती खाती मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. खातेवाटपाची यादी पुढील काही तासांत जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.

खातेवाटपाबाबत शिवसेनेची यादी (Political)मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली आहे. तर थोड्याच वेळात राष्ट्रवादीची ही यादी देवेंद्र फडणवीसांकडे सादर करणार आहे. त्यामुळे पुढील काही तासांमध्ये खाते वाटपाचा तिढा सुटणार असल्याचं बोललं जात आहे. तसेच मंत्रिमंडळात अधिकची खाती मिळवण्यात शिवसेनेला यश आलं आहे. गृहनिर्माण आणि पर्यटन ही दोन नवी खाती नव्याने मिळाल्याची सूत्रांची माहिती आहे.

एकनाथ शिंदेंकडे गृहनिर्माण, अजित पवारांकडे अर्थ-
एकनाथ शिंदे स्वतःकडे गृहनिर्माण खातं ठेवणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तर अजित पवार अर्थ खातं सांभाळतील. देवेंद्र फडणवीस स्वत: गृह खातं घेतील. तर राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांची पुन्हा महिला आणि बालविकास कल्याण या मंत्रि‍पदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.

कोणाला कोणती खाती मिळणार?
भाजप-

गृह
महसूल
सार्वजनिक बांधकाम
पर्यटन
ऊर्जा

शिवसेना

नगरविकास
गृहनिर्माण

राष्ट्रवादी काँग्रेस-

अर्थ
महिला आणि बालविकास
उत्पादन शुल्क

शिवसेनेला गृह खात्याऐवजी नगर विकास आणि गृहनिर्माण खातं-
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना नगरविकास खाते मिळणार आहे. तर गृहनिर्माण, उद्योग, पर्यटन ही महत्वाची खातीही शिवसेनेच्या वाट्याला येणार आहेत. तसेच आरोग्य, शालेय शिक्षण खातेही शिवसेनेकडेच कायम राहणार आहे. सार्वजनिक बांधकाम(सा.उपक्रम वगळून ),पाणीपुरवठा खातंही शिवसेनेकडेच राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. जल संधारण, मराठी भाषा, खणीकर्म, माजी सैनिक कल्याण खातीही शिवसेनेच्या वाट्याला येणार आहे. दरम्यान एकनाथ शिंदे सुरुवातीपासून गृहमंत्री खातं शिवसेनेच्या वाट्याला यावं, यासाठी आग्रही होते. परंतु गृह खातं भाजपकडेच राहणार आहे. गृह खात्याऐवजी नगर विकास आणि गृहनिर्माण शिवसेनेला देण्यात आले आहे.

मंत्रिपदाची शपथ घेणारे मंत्री-
कॅबिनेटमंत्री
1.चंद्रशेखर बावनकुळे

  1. राधाकृष्ण विखेपाटील
  2. ⁠हसन मुश्रीफ
  3. ⁠चंद्रकांत पाटील
  4. ⁠गिरीश महाजन
  5. ⁠गुलाबराव पाटील
  6. ⁠गणेश नाईक
  7. ⁠दादा भुसे
  8. ⁠संजय राठोड
  9. ⁠धनंजय मुंडे
  10. ⁠मंगलप्रभात लोढा
  11. ⁠उदय सामंत
  12. ⁠जयकुमार रावळ
  13. ⁠पंकजा मुंडे
  14. ⁠अतुल सावे
  15. ⁠अशोक उईके
  16. ⁠शंभूराज देसाई
  17. ⁠आशिष शेलार
  18. ⁠दत्ता भरणे
  19. ⁠आदिती तटकरे
  20. ⁠शिवेंद्रसिंह भोसले
  21. ⁠माणिकराव कोकाटे
  22. ⁠जयकुमार गोरे
  23. ⁠नरहरी झिरवळ
  24. ⁠संजय सावकारे
  25. ⁠संजय शिरसाठ
  26. ⁠प्रताप सरनाईक
  27. ⁠भरत गोगावले
  28. ⁠मकरंद पाटील
  29. ⁠नितेश राणे
  30. ⁠आकाश फुंडकर
  31. ⁠बाबासाहेब पाटील
  32. ⁠प्रकाश आबिटकर

राज्यमंत्री

  1. माधुरी मिसाळ
  2. ⁠आशिष जयस्वाल
  3. ⁠पंकज भोयर
  4. ⁠मेघना बोर्डीकर साकोरे
  5. ⁠इंद्रनील नाईक
  6. ⁠योगेश कदम

हेही वाचा :

सोन्याच्या दरात आज पुन्हा झाली घट; काय आहेत 22,24,18 कॅरेटचे भाव, जाणून घ्या

मनोज जरांगे नव्या वर्षात करणार धमाका?, केली मोठी घोषणा

थंडीत पाठदुखी वाढते? औषधांऐवजी ‘या’ नैसर्गिक उपायांनी करा वेगाने बरे