थंडीत बनवा कोबीचा पराठा; पौष्टिकतेसह स्वादाचा अनोखा संगम!
सध्या हिवाळा ऋतू सुरु आहे. या ऋतूत शरीराला उष्णता मिळवून (cabbage)देण्यासाठी बहुतेकदा गरम पदार्थ खाल्ले जातात. थंडीत खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये पराठ्याचा आवर्जून समावेश होतो. या ऋतूत भाज्या फार स्वस्त होतात, ज्यामुळे लोक या ऋतूत वेगवगेळ्या गोष्टींचा पराठा बनवून त्याचा आस्वाद घेत असतात. पराठा हा एक पौष्टिक पण तितकाच चविष्ट असा पदार्थ आहे. देशात जवळजवळ सर्वच ठिकाणी हा पदार्थ बनवून खाल्ला जातो. आज मात्र आम्ही तुमच्यासोबत कोबीच्या पराठ्याची एक भन्नाट रेसिपी शेअर करत आहोत.
तुम्हाला कोबीची भाजी खायला आवडत नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही यापासून चविष्ट असा पराठा तयार करू शकता. हा पराठा फार कमी वेळेत आणि निवडक साहित्यापासून तयार केला जातो. सकाळच्या नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. कोबीमध्ये भरपूर फायबर असते ज्यामुळे आरोग्यासाठी फायदेशीर ठरत असते. ही एक कमी चरबीयुक्त भाजी आहे, ज्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. (cabbage)चला तर मग कोबी पराठ्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊयात.
साहित्य
- पाव किलो कोबीएक बटाटा
- एक कांदा
- लसूण
- आलं
- हळद
- मसाला
- गरम मसाला
- मीठ
- बेसनचे पीठ
- तेल
कृती
- कोबी पराथम बनवण्यास सर्वप्रथम कोबी स्वछ धुवून घ्या
- यानंतर कोबी आणि बटाटा किसून घ्या
- नंतर एक कांदा घेऊन तो बारीक चिरून घ्या
- दुसरीकडे मिक्सरच्या भांड्यात लसूण (cabbage)आलं, हळद, मसाला, गरम मसाला, मीठ, बारीक चिरून घेतलेला कांदा घाला आणि बारीक करून घ्या
- यानंतर गॅसवर एक कढई ठेवून यात तेल टाका
- तेल तापले की यात बारीक करून घेतलेले मिश्रण टाका आणि परतून घ्या
- यानंतर यात किसलेला कोबी आणि बटाटा टाका आणि झाकण ठेवून थोडावेळ वाफवून घ्या
- आता परातीत गव्हाचे पीठे टाकून कणिक मळून घ्या
- मळलेल्या पिठाचे लहान गोळे करा आणि यात तयार स्टफिंग व्यवस्थित भरा
- आता पराठे छान लाटा आणि गॅसवर तवा ठेवून यावर छान भाजून घ्या
- पराठ्याच्या दोन्ही बाजूंना तूप किंवा तेल लावायला विसरू नका
- अशाप्रकारे तुमचे कोबीचे पराठे तयार होतील
- लोणचं किंवा चटणीसह हे पराठे खाण्यासाठी सर्व्ह करा
हेही वाचा :
पाणी प्रदूषणामुळे मिरजेतील गणेश तलावात ६०० किलो मासे मृत
हेल्मेट सक्तीबाबत महिलेचे विचित्र विधान; ऐकून पोलीसही झाले हैराण
थरकाप उडवणारी घटना; १५ वर्षीय मुलाच्या शरीराचे १७ तुकडे करून पुरले