केसांसोबत खिशाला कात्री लागणार
सर्वसामान्य नागरिकांना हल्ली महागाईच्या झळा बसत आहेत. (parlors) त्यात आता अजून भर पडणार असून सलून आणि ब्युटी पार्लरचा खर्चही वाढणार आहे. कटिंग आणि दाढी करण्यासाठी नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहेत. तर महिलांना देखील पार्लरमध्ये जाताना पर्स खाली करावी लागणार आहे. 1 जानेवारीपासून महाराष्ट्र नाभिक महामंडळाने हे सलून आणि ब्युटी पार्लरच्या दारात वीस ते तीस टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरवाढीमागचे कारण काय?
1 जानेवारीपासून हे नवीन दर लागू होणार आहेत. विज बिल, कामगारांचा पगार, जीएसटी, वाढती महागाई, इन्कम टॅक्स, प्रोफेशनल टॅक्स आणि दुकानाचे भाडे यासारख्या (parlors)गोष्टींची महागही वाढल्यामुळे व्यवसायिकांना दर वाढवावे लागत असल्याचे सांगितल्या जात आहे.
काय आहेत दर ?
हेअर कट- 20 टक्के वाढ
दाढी- 20 टक्के वाढ
हेअर कलर- 30 टक्के वाढ
क्लीन अप,फेशियल अँड डी टॅन- 30 टक्के वाढ
स्मुथनिंग अँड कॅरीटीन- 30 टक्के वाढ
हेड मसाज, मेनिक्यूर, पेडीक्युर- 30 टक्के वाढ
दरम्यान 1 जानेवारी 2025 या नवीन सालापासून (parlors) मुंबई सह सर्व महाराष्ट्रात सलूनमधील हेअर कट, शेविंग त्याचबरोबर इतर सर्व सौंदर्य प्रसाधन कामावरती किमान 20 ते 30 टक्के दरवाढ करण्यात येणार आहे. याबाबत सलून व्यवसायिकांनी निर्णय घेतला आहे.
हेही वाचा :
पाणी प्रदूषणामुळे मिरजेतील गणेश तलावात ६०० किलो मासे मृत
हेल्मेट सक्तीबाबत महिलेचे विचित्र विधान; ऐकून पोलीसही झाले हैराण
थरकाप उडवणारी घटना; १५ वर्षीय मुलाच्या शरीराचे १७ तुकडे करून पुरले
थंडीत बनवा कोबीचा पराठा; पौष्टिकतेसह स्वादाचा अनोखा संगम!