भारताची फायनलमध्ये धडक, सेमीफायनलमध्ये श्रीलंकेचा पराभव
२०२४ च्या अंडर १९आशिया कपमध्ये भारताने दमदार कामगिरी केली(11wickets) आहे. सुपर फोरच्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने फायनलमध्ये धडक मारली आहे. हा महत्त्वपूर्ण सामना मलेशियातील क्वालालंपूर शहरात रंगला ज्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने भारताला विजयासाठी ९९ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात भारताने ६ विकेट्स गमावून सामना जिंकला. आयुषी शुक्लाने टीम इंडियासाठी घातक गोलंदाजी करत ४ विकेट घेतल्या आणि त्यामुळे तिला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.
प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने २० षटकांत ९ गडी गमावून ९८ धावा केल्या. यादरम्यान नानायककराने ३३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. सुमुदूने ३१ चेंडूंचा सामना करत २१ धावा केल्या. सलामीवीर संजना ९ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली तर हिरुनीने २ धावा केल्या. यादरम्यान आयुषी शुक्लाने भारतासाठी घातक गोलंदाजी केली करत ४ विकेट घेतल्या. श्रीलंकेच्या संघासाठी हा सामना खूपच कठीण होता.(11wickets) भारताकडून आयुषी शुक्लाने चांगली गोलंदाजी केली आणि ४ षटकात फक्त १० धावा दिल्या आणि ४ बळी घेतले. त्याला सामनावीर म्हणूनही निवडण्यात आले. पारुनिकानेही २ बळी घेत ४ षटकात २७ धावा दिल्या. शबनम आणि धृतीला १-१ बळी मिळाला.
या विजयासह भारताने १९ वर्षांखालील महिला टी-२० आशिया कपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यांनी श्रीलंकेचा ४ गडी राखून पराभव केला आहे. भारतासाठी कमलिनीने २६ चेंडूंचा सामना करत २८ धावा केल्या. त्रिशाने २४ चेंडूंचा सामना करत ३२ धावांची खेळी केली. मिथिलाने(11wickets) १२ चेंडूत नाबाद १७ धावा केल्या. कर्णधार निक्की ३ धावा करून बाद झाली. बांगलादेश आणि नेपाळमध्ये आता सामना रंगणार असून या सामन्यात जो संघ जिंकेल तो भारतसोबत लढेल. अंतिम सामना हा २२ डिसेंबरला क्वालालंपूर येथेच रंगणार आहे.
हेही वाचा :
पाणी प्रदूषणामुळे मिरजेतील गणेश तलावात ६०० किलो मासे मृत
हेल्मेट सक्तीबाबत महिलेचे विचित्र विधान; ऐकून पोलीसही झाले हैराण
थरकाप उडवणारी घटना; १५ वर्षीय मुलाच्या शरीराचे १७ तुकडे करून पुरले