कुत्र्यांचा हल्ला; चिमुकल्याच्या तोंड, डोकं आणि मानेवर ४० टाके!

पुण्यामध्ये भटक्या कत्र्यांची दहशत वाढत चालली आहे. काही दिवसांपूर्वी दोन(dog) वर्षांच्या चिमुकलीवर कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच पुण्यातील धनकवडी परिसरात एका चिमुकल्यावर कुत्र्यांनी जीवघेणा हल्ला केलाय. या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चिमुकल्याच्या तोंड, डोकं आणि मानेवर कुत्र्यांनी चावे घेतले असून त्याला ४० टाके पडले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, धनकवडी परिसरातील आंबेगाव पठारमधील भारती विद्यापीठ मागे असणाऱ्या चंद्रागण सोसायटी फेज -7 मध्ये ही घटना घडली आहे. एका चिमुकल्या मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. या हल्ल्यामुळे चिमुकला जबर जखमी झाला आहे. मुलाला किमान ४० हून अधिक टाके पडले आहेत. या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.

रस्त्यावरून जात असताना या चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. या कुत्र्यांनी चिमुकल्याच्या कपाळावर, डोळ्यावर, मानेवर आणि डोक्यावर चावे घेतले. कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चिमुकल्याला स्थानिकांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. या चिमुकल्यावर एका भारती विद्यापीठ(dog) हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.आंबेगाव पठार परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात भटकी कुत्री आहेत. यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून जावे लागत आहे. हे कुत्रे लहान मुलंच नाही तर मोठ्या माणसांवर देखील हल्ले केरत आहेत. नुकताच कुत्र्यांनी चिमुकल्यावर हल्ला केला.

या घटनेनंतर प्रायव्हेट डॉग रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. यावेळी शेकडो नागरिक कुत्र्यांना पकडून देण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. या परिसरामधील (dog)अनेक कुत्रे रेस्क्यू टीमने पकडले. प्रशासनाने या गंभीर घटनेची दखल घेऊन तातडीने कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.

हेही वाचा :

पाणी प्रदूषणामुळे मिरजेतील गणेश तलावात ६०० किलो मासे मृत

हेल्मेट सक्तीबाबत महिलेचे विचित्र विधान; ऐकून पोलीसही झाले हैराण

थरकाप उडवणारी घटना; १५ वर्षीय मुलाच्या शरीराचे १७ तुकडे करून पुरले

केसांसोबत खिशाला कात्री लागणार

हिवाळ्यात ओठांना ठेवा गुलाबी, हा उपाय नक्की करा…