‘विराट कोहली अंथरुणात रडत होता,’ वरुण धवनने केला खुलासा, म्हणाले ‘अनुष्का त्याच्या रुममध्ये…’
विराट कोहलीने(Virat Kohli) भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार असताना संघात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण केला होता. त्याने संघाची उच्च मानकं आणि अपेक्षा दोन्हीही उंचावल्या होत्या. खासकरुन SENA (South Africa, England, New Zealand and Australia) दौऱ्यांमध्ये त्याच्या नेतृत्वातील कामगिरीने लक्ष वेधलं होतं.
कठीण परस्थितींमध्येही भारतीय संघ स्पर्धात्मक असावा अशी विराटची अपेक्षा होती. विराट कोहलीने(Virat Kohli) भारतीय संघाला 2018-19 मध्ये पहिली मालिका जिंकण्यात मदत केली होती. पण नंतर 2018 मध्ये इंग्लंडिविरोधात 1-4 ने पराभव झाल्यानंतर त्याची निराशा झाली होती.
त्या मालिकेत विराट कोहलीची मानसिकता कशी होती याबद्दल बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने खुलासा केला आहे. विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माने वरुण धवनला याबद्दल सांगितलं होतं. त्यावेळी विराट आणि अनुष्का एकमेकांना डेट करत होते.
रणवीर अलाहबादियाचा पॉडकास्ट ‘द रणवीर शो’मध्ये वरुण धवनने हजेरी लावली. यावेळी वरुण धवनने सांगितलं की, “विराटने अनेक अडथळ्यांना पार केलं आहे. जेव्हा तो चांगल्या फॉर्ममध्ये नव्हता तेव्हा नेमकी काय मानसिकता होती याबद्दल अनुष्काने माझ्यासह माहिती शेअर केली होती”.
“मला वाटतं ती नॉटिंगहॅम टेस्ट होती. भारत तिथे हारला होता. अनुष्काने सांगितलं की, ती त्या सामन्यात हजर नव्हती. जेव्हा ती परत आली तेव्हा तिला विराट कुठे आहे हे माहिती नव्हतं. ती रुममध्ये आली तेव्हा विराट झोपलेला होता आणि अक्षरश: रडत होता,” अशी माहिती वरुण धवनने दिली आहे.
Guess he's talking about the Edgbaston test 2018. Or maybe from 2021 Eng tour. pic.twitter.com/8SwzOH7PIT
— iᴍ_Aʀʏᴀɴ18 (@crickohli18) December 19, 2024
वरुण धवन नेमका कोणता कसोटी सामना होता याबद्दल निश्चित नाही. कारण ट्रेंट ब्रिज सामना हा भारताने जिंकलेल्या मालिकेतील एकमेव सामना होता. परंतु इतर पराभवांची अडचण कायम राहिली. धवन पुढे म्हणाला: “त्या दिवशी तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज असतानाही, त्याने संपूर्ण परिस्थिती स्वतःवर घेतली, जसं मी अपयशी ठरलो. तो संघाचा कर्णधार होता”. 2018 मध्ये अनुष्का शर्माने वरुण धवनसोबत ‘सुई धागा’ चित्रपटात काम केलं होतं.
हेही वाचा :
आनंदाची बातमी! सोन्या – चांदीच्या दरात मोठी घसरण
शपथविधी होऊन 5 दिवस उलटले तरी महायुतीचे मंत्री बिनखात्याचेच!
कांद्यावरील २० टक्के निर्यातशुल्क तातडीने रद्द करावे