शेतकऱ्यांना मोदी सरकारचं मोठं गिफ्ट

मोदी सरकारनं शेतकऱ्यांसाठी(farmers) मोठा निर्णय घेतला आहे. सरकारनं सुक्या खोबऱ्याच्या एमएसपीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सुक्या खोबऱ्याच्या हमीभावात 422 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळं खोबऱ्याची एमएसपी 12100 रुपये प्रति क्विंटल असणार आहे. त्यासाठी सरकारनं 855 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आला. कृषी खर्च आणि किमती आयोगाच्या शिफारशींच्या आधारे ही आधारभूत किंमत ठरवण्यात आली आहे. उत्पादन खर्चापेक्षा 50 टक्के अधिक एमएसपी निश्चित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे एकूण आर्थिक भार 855 कोटी रुपयांवर येईल.

नॅशनल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह कंझ्युमर्स फेडरेशन यांची कोपरा आणि सोललेल्या नारळाच्या खरेदीसाठी केंद्रीय नोडल एजन्सी म्हणून निवड करण्यात आली आहे.

कर्नाटक हे नारळाचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य आहे. एकूण उत्पादनात त्याचा वाटा 32.7 टक्के आहे. त्यापाठोपाठ तामिळनाडू (25.7 टक्के), केरळ (25.4 टक्के) आणि आंध्र प्रदेश (7.7 टक्के) यांचा क्रमांक लागतो. याशिवाय महाराष्ट्रातही नारळाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. तसेच पश्चिम बंगाल, ओडिशा, दमण-दीव आणि गुजरातमध्येही नारळाची लागवड कमी प्रमाणात केली जाते.

वाढीव MSP नारळाच्या उत्पादनांना चांगला नफा तर देईलच पण शेतकऱ्यांना(farmers) नारळ उत्पादन वाढवण्यास प्रवृत्त करेल. दरम्यान, खोबऱ्याच्या MSP मध्ये वाढ केल्यामुळं याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होणार आहे. तसचे या वाढलेल्या दरामुळं नारळ लागवडीला देखील प्रोत्साहन मिळणार आहे.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत याबाबत निर्णय घेतला. यानिर्णयामुळे आता सुक्या खोबऱ्याच्या (कोपरा) किमान आधार मूल्यात 422 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ज्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल.

नाफेड आणि एनसीसीएफ यांची सुक्या खोबऱ्याची खरेदी करण्यासाठी केंद्रीय नोडल एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. याशिवाय राज्य सरकारे देखील महत्वाची भूमिका पार पाडतील, असेही अपेक्षा वैष्णव यांनी व्यक्त केली आहे. तर राज्य सरकारे त्यांच्या महामंडळांच्या माध्यमातून सुक्या खोबऱ्याची खरेदी प्रक्रिया पूर्ण करतील, असेही वैष्णव यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा :

रॉबिन उथप्पाच्या विरोधात वॉरंट, अटकेची तयारी सुरु!

Airtel युजर्स लक्ष द्या! आता फ्रीमध्ये मिळेल ZEE5 चा एक्सेस

‘विराट कोहली अंथरुणात रडत होता,’ वरुण धवनने केला खुलासा, म्हणाले ‘अनुष्का त्याच्या रुममध्ये…’