8 वेळा पलटी होऊन जमीनदोस्त झाली कार…अपघाताचा Video Viral

‘मौत को छू कर टक्क से वापस आगया’ हा चित्रपटातील डायलॉग तुम्ही नक्कीच कधी ना कधी ऐकला असावा. याचेच एक मूर्तिमंत उदाहरण नुकतेच समोर आले आहे. घटनेतील थरार काही साधा-सुधा नसून यातील दृश्ये अचंबित करणारी आहेत. आजकाल रस्ते अपघाताचे(accident) प्रमाण फार वाढले आहे. अशा या अपघातात अपघाताची तीव्रता बघता लोकांचा एकतर जीव जातो नाहीतर त्यांना गंभीर जखमा होतात. मात्र सध्याच्या या थरारक आणि जीवघेण्या अपघातात काही भलतेच घडल्याचे उघड झाले आहे. यात नक्की काय घडले ते जाणून घेऊयात.

राजस्थानच्या नागौर जिल्ह्यात शुक्रवारी महामार्गावर एक धक्कादायक घटना घडून आली, यात चक्क आठ वेळा एसयूव्ही उलटल्याने पाच प्रवासी चमत्कारिकरित्या बचावले. सीसीटीव्हीत कैद झालेल्या या नाट्यमय घटनेत भरधाव वेगाने जाणारी कार नियंत्रणाबाहेर गेली आणि नंतर कार शोरूमसमोर थांबली.

पाच प्रवासी घेऊन जाणारी एसयूव्ही महामार्गावरून वेगाने जात असताना वळण घेत असताना चालकाचे नियंत्रण सुटले. काही क्षणातच कार पुन्हा पलटी होऊन शोरूमच्या गेटला धडकली, त्यामुळे गेटचेही नुकसान झाले. कार फार वाईट अवस्थेत पडून राहिली आणि आजूबाजूला त्याचे तुकडे पसरले दिसले. यावरूनच आपण अपघाताच्या(accident) तीव्रतेचा अनुमान लावू शकतो.

अपघाताचे गांभीर्य असूनही, घटनास्थळावरून घेतलेल्या छायाचित्रांमध्ये कार उलथापालथ झालेली दिसते, जी अपघाताची तीव्रता सांगते. अधिका-यांनी सांगितले की, कार पलटी होत असताना चालकाला त्यातून उडी मारण्यात यश आले. गाडी थांबल्यानंतर उर्वरित चार प्रवासी बाहेर आले. कार उलटल्यानंतर शोरूममध्ये घुसली.

शोरूमच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘कुणालाही दुखापत झाली नाही, त्यांनी आत जाताच चहा मागवला. आश्चर्यकारक बाब म्हणजे, या थरारक अपघातात सर्वजण सुखरूप बाहेर पडले. हे लोक नागौरहून बिकानेरला जात असताना हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप तपासात असले तरी अधिकाऱ्यांनी अपघाताचे कारण कारचा जास्त वेग असल्याचे सांगितले आहे.

या थरारक अपघाताचा व्हिडिओ @HateDetectors नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेविषयीची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे SUV चे कोणते मॉडेल आहे?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मी तीच माहिती इंटरनेटवर शोधत होतो, ही कोणती एसयूव्ही आहे याची खात्री नाही…”.

हेही वाचा :

गौतमी पाटील चक्क पुण्याच्या पुस्तक महोत्सवामध्ये

मला जेलमध्ये टाकण्याचे प्रयत्न झाले; एकनाथ शिदेंची तुफान फटकेबाजी

राज्यात लवकरच अत्याधुनिक कारागृहे उभारणार : मुख्यमंत्र्यांची माहिती