सांगलीतून रुपाली चाकणकर यांचा मोठा दावा; म्हणाल्या, आता आमच्या पक्षात…

सांगली : सांगलीतील पूर्वीच्या काळात माझ्याबरोबर काम केलेल्या अनेक महिलांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये(political news) प्रवेश केला आहे. पण जिल्ह्याला वेगळी उत्सूकता आहे. पण येत्या कालावधीमध्ये मोठे प्रमाणात पक्ष प्रवेश होतील, असा विश्वास राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केला.

महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर सांगलीच्या दौर्‍यावर आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या(political news) शहर जिल्हा कार्यालयाला भेट दिली. तेथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, राज्यात सोनोग्राफी सेंटरची संख्या वाढत आहे. अनेक ठिकाणी गैरप्रकार होत असल्याचे आढळून येत आहे.

कोल्हापूर गर्भपात प्रकरणी कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. सीमालगत भागात असे प्रकार होत आहेत. याला आळा घालण्यासाठी तपासणी मोहिम सुरू करण्याच्या सूचना अधिकार्‍यांना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

त्या पुढे म्हणाल्या, माजी मंत्री छगन भुजबळ यांना मंत्रीपद न मिळाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडे मारले होते. हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असू शकत नाही. या घटनेचा मी निषेध करते.

भुजबळ यांच्या बाबतीत वरिष्ठ योग्य ते निर्णय घेतील, पण हे कृत्य चुकीचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. काहींनी नागपूर पेट्रोलपंप चालक महिलेला माफी मागावी लावली होती. ही घटना दुर्दैवी असून या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, कार्याध्यक्ष जमील बागवान, महिला आघाडीच्या राधीका हारगे, जयंत जाधव आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देण्यात आलेलं नाही. उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात अन्न आणि नागरी पुरवठा खातं सांभाळलेल्या भुजबळांना आता मंत्रिपद देण्यात आलेलं नाही. त्यांच्याऐवजी नाशिकमधून राष्ट्रवादीनं दोघांना मंत्रिमंडळात स्थान दिलं आहे.

नरहरी झिरवळ आणि माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपदी संधी देण्यात आली आहे. त्यात कोकाटे यांच्या अभिनंदनासाठी लावण्यात आलेले बॅनर लक्षवेधी ठरत आहेत. भुजबळांच्या नाराजीवरुन त्यांचे समर्थक देखील आक्रमक झाले आहेत.

विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन काल संपलं. त्यानंतर आज मंत्री माणिकराव कोकाटे नाशिकला परतले. त्यांच्या निवासस्थानाजवळ अभिनंदनाचे अनेक बॅनर लागले आहेत. यातील बऱ्याच बॅनरवर भुजबळ यांचा फोटो नाही. दोघेही एकाच पक्षाचे असूनही कोकाटे यांच्यासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवरुन भुजबळ यांचा फोटो गायब आहे. त्यामुळे हे बॅनर चर्चेचा विषय ठरत आहेत.

हेही वाचा :

छगन भुजबळांची रणनीती ठरली? ‘त्या’ बैठकीनंतर घेणार मोठा निर्णय

‘लाडक्या बहिणीं’साठी मोठी बातमी; मिळालेल्या तक्रारींची ‘अशी’ घेतली सरकारने दखल

शिंदेंची खेळी यशस्वी? अजितदादांकडं तिजोरीच्या चाव्या पण, खर्च शिंदेच करणार