तर केंद्रातील मोदी सरकार कोसळणार….?
बिहारच्या आगामी निवडणूक 2025 च्या तयारीसंदर्भात बिहार भाजप(political) कोअर कमिटीची दोन दिवसीय बैठक रविवारपासून दिल्लीत सुरू होत आहे. या बैठकीत बिहार राज्य कोअर कमिटीचे सर्व सदस्य सहभागी होणार आहेत. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेदेखील उपस्थित राहू शकतात.
या बैठकीत भाजप 2025 च्या बिहार विधानसभा(political) निवडणुकीचा अजेंडा ठरवू शकतो. त्याचबरोबर एनडीए आघाडीतील बड्या नेत्याबाबतही निर्णय घेतला जाऊ शकतो. या बैठकीत सहभागी होण्यासाठी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि अनेक ज्येष्ठ नेते दिल्लीत पोहोचले आहेत. पण दुसरीकडे बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या गोटात वेगळ्याच हालचाली सुरू झाल्याची बातमी समोर येत आहे.
गेल्या आठ दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या एका वक्तव्यानंतर राजधानीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बिहारच्या आगामी विधानसभा निवडणुका कुणाच्या नेतृत्त्वात लढवल्या जातील, हे आम्ही बसून ठरवू, असं वक्तव्य अमित शाहांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होत. त्यामुळे बिहारमद्ये नितीश कुमार यांच मुख्यमंत्रिपद जाणार , अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.
बिहारमध्ये निवडणुकांची तयारी सुरू झाली असताना नितीश कुमारांच्या गोटात मात्र दुसऱ्याच हालचाली सुरू झाल्या आहेत. याच कारण म्हणजे, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधित 135 जागांवर विजय मिळवला. त्यानंतर भाजपने एकनाथ शिंदे यांनाही बाजूल सारत देवेंद्र फडणवीस यांच्या हाती मुख्यमंत्रिपद दिले. पण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात निवडणुका लढवूनही भाजपने त्यांना केवळ उपमुख्यमंत्रिपद आणि नगरविकास खात्यावर त्यांची बोळवण केली.
मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात गृहमंत्रिपदासाठी(political) आग्रही असतानाही त्यांना ते मंत्रिपद देण्यास भाजपने स्पष्ट नकार दिला. त्यामुळे महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्येही असा प्रयोग होऊ शकतो. अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळेही नितीश कुमार अस्वस्थ आहेत. त्यामुळे नितीश कुमार एनडीएतून बाहेर पडणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे मोदींच्या नेतृत्त्वाखालील सरकार केव्हाही कोसळू शकते, नितीश कुमार आपले मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी मोदींची साथ सोडू शकतात, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. विशेष म्हणजे त्यादृष्टीने नितीश कुमारांच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत.
दोन दिवसांपूर्वी (२० डिसेंबर) नितीश कुमारांची अचानक तब्येत बिघडली. त्यामुळे त्यांनी आपले सर्व नियोजित कार्यक्रमही रद्द केले. पण एकीकडे अमित शाहांंनी असं विधान करणं आणि नितीश कुमारांची अचानक तब्येत बिघडणं, यामुळे नितीश कुमारांच्या जनता दल (युनायटेड) मध्ये नेमक काय चाललंय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे नितीश कुमारांच्या या हालचालींमुळे भाजपनेही सावध पावले उचलायला सुरूवात केली आहे.
त्यातच गेल्या आठड्याच अमित शाहांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेलं विधान देखील कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे. बिहारमधील दलित वोटबँक लक्षात घेता, अमित शाहांच्या त्या विधानाचा नितीश कुमारांना फटका बसू शकतो, त्यामुळे नितीश कुमार वेगळा निर्णय घेतील, अशी शक्यता आहे. विशेष म्हणजे,नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्ष हा एनडीएमधील तिसरा सर्वात मोठा पक्ष आहे. जेडीयूचे 12 खासदार आहेत. जर ते बाहेर पडले तर एनडीएचे बहुमत कमी होईल, दुसरीकडे एकनाथ सिदे यांच्याकडेही सात खासदार आहेत. मुख्यमंत्रिपद आणि गृहमंत्रिपद न मिळाल्याने शिंदे गटातील नेत्यामध्येही मोठी नाराजी आहे. त्यामुळे नितीश कुमारांनी एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यास केंद्रातील मोदी सरकार कोसळू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा :
माजी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा भीषण अपघात….
मनातील इच्छा-आकांक्षा पूर्ण होणार, भोलेनाथ आज ‘या’ राशींवर राहणार प्रसन्न
मद्यधुंद डंपर चालकाने फुटपाथवर झोपलेल्यांना चिरडलं…