अल्लू अर्जुनच्या घरावर कोणी केला टोमॅटो- दगडांचा मारा? पुतळाही जाळला

दाक्षिणात्य कलाविश्वामध्ये कमालीची लोकप्रियता(Entertainment news) असणाऱ्या अभिनेता अल्लू अर्जुन याच्यामागे असणाऱ्या अडचणी काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. अभिनेत्याचा ‘पुष्पा 2’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेचा मृत्यू ओढावला.

ज्यानंतर अभिनेत्याच्या(Entertainment news) अडचणींमध्ये भर पडल्याचं पाहायला मिळालं. पोलिसांनीसुद्धा या मेगास्टारवर कारवाई केल्याचं पाहायला मिळालं. दरम्यानच्या काळात सोशल मीडियावर एकाएकी अभिनेत्याच्या विरोधात सूर आळवणाऱ्यांचा आकडा वाढत असल्याचं स्पष्ट झालं.

रविवारी उस्मानिया विद्यापीठातील काही विद्यार्थी नेत्यांनी या अभिनेत्याच्या घराबाहेर एकच गोंधळ घातला. दरम्यान अभिनेत्याच्या घरावर हल्ला करण्यात आला. इतक्यावरच न थांबता इथं त्याचा पुतळाही जाळण्यात आला. काहींनी त्याच्या घरावर टोमॅटो आणि दगडांचा मारा केला. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीनं 8 जणांना ताब्यात घेतलं.

सोशल मीडियावर ही बातमी वाऱ्याच्या वेगानं पसरली आणि पाहता पाहता चाहत्यांनी अभिनेत्याची साथ देणाऱ्या पोस्ट करण्यास सुरुवात केली. X वर सोमवारी सकाळपासून Stop Cheap Politics On ALLU ARJUN हा टॅग ट्रेंड करू लागला. अभिनेत्याच्या विरोधात प्रदर्शन करणाऱ्यांविरोधात चाहत्यांनी आवाज उठवला आणि अभिनेत्याला या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये जाहीर साथ दिली. अभिनेत्याला राजकारणापासून दूर ठेवा, अशीच मागणी चाहत्यांनी उचलून धरली. काही चाहत्यांनी रस्त्यांवर उतरत अल्लू अर्जुनला पाठिंबा देणारे फलक झळकवले.

घरावर हल्ला होण्यापूर्वीच अल्लू अर्जुननं एक सोशल मीडिया पोस्ट केली होती. यामध्ये त्यानं काहीजणांविरोधात आपण कारवाईचं पाऊल उचलणार असल्याचं सांगत इशारावजा संदेश दिला होता. ‘मी चाहत्यांना आवाहन करु इच्छितो की, त्यांनी आपल्या भावना जबाबदारीनं व्यक्त कराव्यात.

ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीनं व्यक्त होताना कुठंही चुकीच्या भाषेचा आधार घेऊ नका. स्वत:ला माझे चाहते म्हणवत फेक आयडी किंवा प्रोफाईलनं कोणीही मेसेज करणार असेल तर त्यांच्याविरोधात सक्तीची कारवाई केली जाईल.’ असं त्यानं या पोस्टमधून स्पष्ट केलं होतं.

हेही वाचा :

तर केंद्रातील मोदी सरकार कोसळणार….? 

“महात्मा गांधी पाकिस्तानचे राष्ट्रपिता, ते चुकून भारताचे…”; प्रसिद्ध गायकाचं वादग्रस्त वक्तव्य

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी; छगन भुजबळ मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला