थर्टी फर्स्टला तळीरामांची चांदी! पहाटेपर्यंत मिळणार दारू
नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी सर्वच जण सज्ज झाले आहेत. ३१ डिसेंबरला थर्टी फर्स्ट जल्लोषात साजरा करून रात्री बाराच्या ठोक्याला नव्या वर्षाचं स्वागत केलं जातं. पार्टीचाही बेत असतोच. लाखो लिटर दारू(Alcohol) अन् बिअर रिचवली जाते. असाही सगळा रागरंग असतोच. या जल्लोषात आता सरकारी आदेशाची भर पडली आहे. अर्थात हा आदेश तळीरामांच्या आनंदात भर घालणाराच आहे.
नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने राज्यातील दारुची(Alcohol) दुकाने, पब, बार पहाटेपर्यंत सुरू राहणार आहेत. परंतु, कायदा आणि सुव्यवस्था, सार्वजनिक शांततेचा विचार करून परवानगी नाकारण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
2024 वर्ष संपायला काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे नवीन वर्षाच्या स्वागताची जोरदार तयारी केली जात आहे. थर्टी फर्स्टला रात्रभर होणारा जल्लोष विचारात घेऊन सरकारी पातळीवरही नियोजन केलं जात आहे.
कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी प्रशासनाकडून घेतली जात आहे. या काळात मद्य आणि बिअरला मागणी वाढलेली असते. हॉटेल्स, पबमधील पार्ट्याही असतात. याद्वारे मोठ्या प्रमाणात महसूलही मिळतो. या गोष्टींचा विचार करून आता सरकारनेही वेळेत बदल केला आहे.
हेही वाचा :
मागच्या 110 वर्षांत घडलं नाही ते ‘पुष्पा 2’ने करुन दाखवलंय!
मुलीला वेगळ्या स्टाईलमध्ये प्रपोज करायला गेला अन्…Video
कडाक्याच्या थंडीत पावसाचा धडाका: राज्यात वरुणराजाचा कहर