बूम बूम बुमराह… मारला विकेटचा चौकार, ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज फलंदाजांना दाखवला बाहेरचा रस्ता
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चौथा कसोटी(cricket) सामना सुरु आहे, या सामन्याचा आज चौथा दिवस आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाने या सामन्याची दमदार सुरुवात केली आहे. यामध्ये भारताच्या गोलंदाजांची ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी घाम गाळला होता. त्यानंतर आता भारताचा युवा खेळाडू नितीश कुमार रेड्डीने टीम इंडियाला संकातून बाहेर काढले आहे आणि भारताच्या संघाचे सामन्यात पुनरागमन केले आहे.
नितीश कुमार रेड्डीने संघासाठी ११४ धावांची खेळी खेळली. आज सकाळी सामान्यांच्या(cricket) चौथ्या दिनी भारताच्या गोलंदाजांनी कमाल करून दाखवली आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या इनिंगमध्ये ४७४ धावा केल्या होत्या. त्यानंतर भारताच्या संघाने ३६९ धावा केल्या आहेत. तरीही ऑस्ट्रेलियाच्यास संघाकडे आघाडी आहे.
भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने त्याची जादू दुसऱ्या इनिंगमध्ये दाखवली आहे. त्याने ऑस्ट्रेलियाच्या चार गोलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे. यामध्ये सॅम कॉन्स्टास, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श आणि अलेक्स कॅरी या खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्याच्या या गोलंदाजीने भारताच्या संघाला हा सामना जिंकण्याचे चान्स आणखीनच वाढले आहेत. ऑस्ट्रेलियाच्यास संघाने दुसऱ्या इनिंगमध्ये ९१ धावा करून सहा विकेट्स गमावले आहेत. त्यामुळे भारताच्या संघासाठी हे चांगले संकेत आहेत.
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने संघासाठी दुसऱ्या इनिंगमध्ये दोन विकेट्स घेतले आहेत. यामध्ये त्याने ऑस्ट्रेलियाच्या दोन महत्वाच्या फलंदाजांना बाहेर केले आहे. मोहम्मद सिराजने उस्मान ख्वाजा आणि स्टीव्ह स्मिथ या दोन फलंदाजांना बाहेर केले आहे. स्टीव्ह स्मिथने पहिल्या इनिंगमध्ये १४० धावांची खेळी खेळली होती त्यामुळे या इनिंगमध्ये त्याचा विकेट घेणं फार गरजेचं होत.
पहिल्या डावात ४ विकेट घेणाऱ्या जसप्रीत बुमराहने दुसऱ्या डावातही तितक्याच विकेट घेतल्या. या काळात त्याने क्रिकेटच्या प्रदीर्घ फॉरमॅटमध्ये २०० विकेट्सही पूर्ण केल्या. बुमराहने कसोटीत विकेटचे द्विशतक पूर्ण करून इतिहास रचला आहे. त्याने सर्वात कमी सरासरीने २०० बळी घेण्याचा विश्वविक्रम केला आहे.
जसप्रीत बुमराहने आतापर्यंत खेळलेल्या ४४ सामन्यांमध्ये १९.३८ च्या सरासरीने २०२ विकेट घेतल्या आहेत. कसोटी क्रिकेटच्या १४७ वर्षांच्या इतिहासात २० पेक्षा कमी सरासरीने २०० बळींचा टप्पा गाठणारा तो पहिला गोलंदाज आहे. होय, बुमराहने या प्रकरणात माल्कम मार्शल, जोएल गार्नर आणि कर्टली ॲम्ब्रोस या दिग्गज गोलंदाजांचा पराभव केला आहे.
Jasprit Bumrah bowling heat here at the MCG!
— BCCI (@BCCI) December 29, 2024
Live – https://t.co/MAHyB0FTsR… #AUSvIND pic.twitter.com/D0yVnvTWM9
जसप्रीत बुमराह हा भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान २०० बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. बुमराहने ४४ सामन्यांमध्ये हा पराक्रम केला आहे, ऑल ओव्हर रेकॉर्डबद्दल बोलायचे तर आर अश्विन ३९ सामन्यांसह या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे, तर बुमराह दुसऱ्या स्थानावर आहे. जसप्रीत बुमराह सर्वात कमी चेंडूत २०० कसोटी बळी घेणारा चौथा गोलंदाज ठरला आहे. वकार युनूस, डेल स्टेन आणि कागिसो रबाडा या महान खेळाडूंच्या यादीत त्याने आपले स्थान निर्माण केले आहे.
हेही वाचा :
आज गजकेसरी योगासह जुळून आले मोठे शुभ योग; 5 राशींवर राहणार लक्ष्मीची कृपा
तरुणांसाठी बेरोजगार भत्ता योजना सुरू करणार? केंद्र सरकारने दिले ‘असे’ उत्तर
महायुतीत नाराजीनाट्य कायम; मंत्रिपद मिळूनही ‘या’ मंत्र्यांनी अद्याप स्वीकारला नाही पदभार