ठाकरे गटाला मोठं खिंडार, तब्बल ‘इतक्या’ पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत(political news) महाविकास आघाडीला मोठं अपयश मिळालं. त्यात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला 20 च्या पुढचा आकडाही गाठता आला नाही. या निकालानंतर अनेक नेत्यांनी त्यांची साथ सोडल्याचं दिसून आलं. अशात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का देणारी एक बातमी समोर आलीये.नाशिकमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना धक्का दिलाय.

नाशिकमध्ये एसटी(political news) कामगार सेनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुका होण्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांना मोठा झटका बसलाय. नाशिक हा ठाकरेंच्या शिवसेनेचा गड मानला जात होता.

लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे राजाभाऊ वाझे यांनी शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांचा पराभव केला होता. तर, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्यात महायुतीने प्रभावी कामगिरी करून दाखवली. अशात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या एसटी कामगार सेनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय.

शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी एसटी कर्मचारी सेनेच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा प्रवेश झाला. एकनाथ शिंदे यांच्या कामगिरीवर प्रभावित होऊन आपण प्रवेश केल्याच्या भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. ठाकरेंच्या शिवसेनेला नाशिक जिल्ह्यात मोठा फटका बसलाय. निवडणुकी दरम्यान आणि निवडणुकीनंतरही अनेक शिवसेना उबाठाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आले आहेत. ठाकरे यांच्या पक्षाला अजूनही गळती सुरू असल्याचंच चित्र यातून सध्या तरी दिसून येतंय.

हेही वाचा :

शिवसेना खासदार रवींद्र वायकरांच्या गाडीला अपघात

टाटा समूहाची रोजगारासाठी मोठी योजना, 5 वर्षात 5 लाख उत्पादन नोकऱ्या निर्माण होतील

आज सोमवती अमावस्या, भोलेनाथ ‘या’ राशींवर करणार सुखाचा वर्षाव!