दोस्त दोस्त ना रहा! जखमी मित्राला रुग्णालयात नेण्याऐवजी…; पोलिसांकडून गुन्हा दाखल
पुणे: मित्रासह(Friends) दुचाकीवरून घरी जाताना कारला धडक दिल्याने अपघात झाला. यात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या मित्राला दुखापत झाली. मात्र, जखमी मित्राला रुग्णालयात नेण्याऐवजी त्याला शाळेच्या मैदानात टाकून देऊन तो पळून गेला. परिणामी वेळेवर उपचार न मिळाल्याने त्या मित्राचा दुर्देवी मृत्यु झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात दुचाकी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आहे.
संतोष नागनाथ भिसे (वय २५, रा. मार्वेâटयार्ड) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. तर, कृष्णा लक्ष्मण ससाणे असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बिबवेवाडी येथील पुष्प मंगल कार्यालयासमोर बुधवारी (दि.२५) पहाटे ही घटना घडली. संतोष भिसे आणि कृष्णा ससाणे हे दोघे मित्र(Friends) आहेत. बुधवारी रात्री दुचाकीवरून ते घरी निघाले होते. संतोष भिसे हा दुचाकी चालवित होता.
पुष्प मंगल कार्यालयासमोर भिसे याने राँग साईडने जात एका कारला धडक दिली. या अपघातात मागे बसलेला कृष्णाला मार बसला. त्याला उपचाराची गरज होती. मात्र, त्याने कोणालाही न कळविता चिंतामणी देशमुख उर्दू शाळेच्या मोकळ्या मैदानात कृष्णाला ठेवून निघून गेला.
दुसर्या दिवशी सकाळी पोलिसांना मैदानात मृतदेह मिळाला. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पहाटेच्या सुमारास अपघात झाल्याचे दिसून आले. त्याचा तपास केल्यानंतर मैदानात जो मृतदेह सापडला, ती व्यक्ती या अपघातात असल्याचे दिसून आले. ससाणे याला वेळेवर उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यु झाला. त्यामुळे मोटारसायकलचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक अशोक येवले पुढील तपास करीत आहेत.
हेही वाचा :
धक्कादायक! क्रिकेट खेळताना मैदानावर अटॅक येऊन जागीच मृत्यू
‘केरळ मिनी पाकिस्तान; प्रियंकांना मत देणारे अतिरेकी!’ नितेश राणेंचे वादग्रस्त वक्तव्य
अरविंद केजरीवालांनी रणशिंग फुंकले! हिंदू आणि शीख पुजाऱ्यांना देणार दरमहा १८ हजार रुपये