जसप्रीत बुमराहला ‘टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर’साठी नामांकन, या दिग्गज खेळाडूंचा समावेश

सध्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये बॉर्डर गावस्कर(cricket) मालिका सुरु आहे. यामध्ये भारताचा स्टार जसप्रीत बुमराहने २०२४ मध्ये कमालीची कामगिरी संघासाठी केली आहे. त्याने झालेल्या T२० विश्वचषकामध्ये त्याचबरोबर सुरु असेलेल्या बॉर्डर गावस्कर मालिकेमध्ये सुद्धा त्याने अविश्वसनीय कामगिरी करून दाखवली आहे. बुमराहने यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

४ खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने पुरुष कसोटी क्रिकेटर(cricket) ऑफ द इयरसाठी नामांकन खेळाडूंची नावे सांगितली आहेत. ज्यामध्ये भारताचा एक, इंग्लंडचा २ आणि श्रीलंकेचा एक खेळाडू आहे. या चार खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमध्ये आपापल्या संघासाठी अप्रतिम कामगिरी केली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची २०२४ सालातील ‘टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर’साठी नामांकन केले आहे. या वर्षी बुमराह कसोटी फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. बुमराह व्यतिरिक्त, या यादीमध्ये श्रीलंकेचा कमिंडू मेंडिस, इंग्लंडचा जो रूट आणि हॅरी ब्रूक यांनाही आयसीसीने या सन्मानासाठी नामांकन दिले आहे.

एका वर्षात जसप्रीत बुमराहने अप्रतिम कामगिरी केली आहे. बुमराहने या वर्षात १३ कसोटी सामने खेळले असून त्यात त्याने गोलंदाजी करताना ७१ विकेट घेतले आहेत. सध्या बुमराह ऑस्ट्रेलियात अत्यंत धोकादायक गोलंदाजी करत आहे. या मालिकेत आतापर्यंत बुमराह सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. मेलबर्न कसोटीच्या दुसऱ्या डावात बुमराहने ५ विकेट घेतल्या.

एका वर्षात जो रूटने १७ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये रूटने फलंदाजी करताना १५५६ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये ६ शतके आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे. रुटची चमकदार कामगिरी इंग्लंडबाहेरही पाहायला मिळाली आहे. त्याने संघासाठी कमालीची कामगिरी २०२४ मध्ये करून दाखवली आहे.

श्रीलंकेचा फलंदाज कामिंडू मेंडिसनेही यंदा चांगलीच छाप पाडली आहे. यावेळी एका कॅलेंडर वर्षात कामिंदू मेंडिसने ९ सामन्यात १०४९ धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याची सरासरी ७४.९२ राहिली आहे. तर न्यूझीलंडविरुद्ध कामिंडू मेंडिसने दोन सामन्यांत सलग दोन द्विशतके झळकावली होती.

इंग्लंडचा शानदार फलंदाज हॅरी ब्रूकने या कॅलेंडर वर्षात १२ कसोटी सामने खेळले आहेत. फलंदाजी करताना हॅरी ब्रूकने ११०० धावा केल्या. या कालावधीत त्याची सरासरी ५५ राहिली आहे. ज्यामध्ये तीन अर्धशतके आणि एका त्रिशतकांचा समावेश आहे.

हेही वाचा :

दोस्त दोस्त ना रहा! जखमी मित्राला रुग्णालयात नेण्याऐवजी…; पोलिसांकडून गुन्हा दाखल

अरविंद केजरीवालांनी रणशिंग फुंकले! हिंदू आणि शीख पुजाऱ्यांना देणार दरमहा १८ हजार रुपये

सुरेश धसांना ‘ते’ वक्तव्य भोवणार? महिला आयोग अ‍ॅक्शनमोडमध्ये, पोलिसांना दिले ‘हे’ निर्देश